कृषी दूतांकडून शेतकऱ्यांना बियाणांच्या प्रकाराची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:36 AM2021-09-11T04:36:26+5:302021-09-11T04:36:26+5:30
विविध कृषिदूतांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणांबाबत फसवणूक करू नये म्हणून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांना बियाणांच्या प्रकाराची ओळख ...
विविध कृषिदूतांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणांबाबत फसवणूक करू नये म्हणून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांना बियाणांच्या प्रकाराची ओळख करून देण्यात आली. सोबतच संबंधित बियाणे किती प्रमाणात शुद्ध असतात, त्या बियाणांच्या बॅगवर कोणत्या प्रकारचे टॅग लावलेले असतात, संबंधित बियाणांचे उत्पादन किती दिवसांमध्ये निघेल याबाबतची माहितीही बियाणांच्या थैलीवर लावलेल्या टॅगवर उल्लेख केलेला असेल असेच बियाणे खरेदी करावे, असे सांगण्यात आले. अशाप्रकारचे बियाणे खरेदी केल्यावर आपणास फसवणूक झाले असे आढळून आल्यास त्यामध्ये दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून तक्रार दाखल करता येऊ शकते, असे सांगण्यात आले.
यावेळी लाखनी येथील सेवकभाऊ वाघाये पाटील कृषी महाविद्यालय कृषिदूत दयाल धनविजय, सोनापूर गडचिरोली येथील कृषी महाविद्यालय कृषिदूत जयपाल राऊत व गेवराई तांडा औरंगाबादचे धनेश्वरी मानव विकास मंडळ कृषी महाविद्यालय कृषिदूत हेमंत डिब्बे, आनंदवन वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालय कृषिदूत नरेश खरकाटे, चामोर्शी येथील केवळराम हरडे कृषी महाविद्यालय कृषिदूत शुभम रघुते व पायल सरकार यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
100921\img-20210908-wa0018.jpg
तालुक्यातील गवराळा येथील शेतकऱ्यांना बियाणांची ओळख करुन देतांना कृषीदुत