भंडाऱ्यात जनावरांची अवैध वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:04 PM2018-12-24T22:04:14+5:302018-12-24T22:04:27+5:30
ट्रकमधून जनावरांची अवैध वाहतूक करताना पोलीस पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई भंडारा शहरातील नागपूर नाका मार्गावर केली. यात २४ जनावरांची सुटका करण्यात आली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ट्रकमधून जनावरांची अवैध वाहतूक करताना पोलीस पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई भंडारा शहरातील नागपूर नाका मार्गावर केली. यात २४ जनावरांची सुटका करण्यात आली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
ईमरान रियाज खान (२३), शोहेब मुकिम बेग (१९) दोन्ही रा. चंगेरा (जि.गोंदिया) असे अटक केलेल्या इसमांची नावे आहेत. ट्रक क्रमांक एमएच ३१ सीबी ७८६९ या वाहनातून जनावरांना कोंबून अवैध वाहतूक होत असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाला मिळाली.
ठाणेदार सुधाकर चव्हाण व पोलीस नायक बळीराम उईके यांनी वेळीच सतर्कता दाखवून या ट्रकचा पाठलाग करून अडविले. यात २४ जनावरे कोंबून भरलेल्या स्थितीत आढळली.
जनावरांची एकूण किंमत दोन लाख १६ हजार रूपये असून ट्रक जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपीविरूद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनावरांना पिंपळगाव सडक येथील गो शाळेत ठेवण्यात आले आहे. अधिक तपास भंडारा ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहे.