‘त्या’ शेतकºयांच्या मृत्युची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:38 PM2017-10-10T23:38:03+5:302017-10-10T23:38:15+5:30
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकºयांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकºयांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.
खा. पटोले यांच्या या मागणीवर केंद्र शासनाने तपासणीसाठी वरिष्ठ अधिकाºयांची चमू यवतमाळ जिल्ह्यात पाठविल्याचे सांगितले. यवतमाळ जिल्ह्याच्या दौºयानंतर पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी विषारी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे २० शेतकºयांचा मृत्यु आणि जवळपास ५०० शेतकºयांचा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहे. यातील बरेचसे रूग्ण शेतकरी रूग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे. या घटनेसाठी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि कृषी अधिकारी जबाबदार आहेत.
या कीटकनाशक औषधाला प्रतिबंधित केले असताना सुद्धा त्यांनी हे कीटकनाशक शेतकºयांना विकले आहे. या विषारी कीटकनाशकाच्या फवरणीमुळे शेतकºयांच्या मृत्यूचे सत्र ६ जुलैपासून सुरू आहे. मात्र, कृषी विभागाच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले.
बीटी कपाशीबाबत केलेल्या प्रचारामुळे हे पीक भरपूर उत्पादन देते. शिवाय यावर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात या कपाशीकडे आकृष्ट झाले. मात्र, ही बाब खोटी ठरलेली आहे. त्यामुळे शेतकºयांनी कपाशीवर बोंडअळी मारण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी केली. यामुळे जवळपास हजार शेतकºयांना विषबाधा झालेली आहे, असेही पत्रात त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषींविरूद्ध कारवाई करण्यात यावी, मागणी खा.पटोले यांनी केली आहे.