हिवरा येथील हत्याकांडाची सखोल चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:34 AM2021-03-21T04:34:21+5:302021-03-21T04:34:21+5:30
या आशयाचे निवेदन गृहमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे २० जानेवारी २०२१ ...
या आशयाचे निवेदन गृहमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे २० जानेवारी २०२१ रोजी अमोल याला रात्रीच्या बारा वाजताच्या सुमारास राकेश मतारे यांचा फोन आला होता. त्यांचे फोनवर बोलणे झाले. त्यानंतर अमोल हा घराबाहेर पडला. अमोलने शेवटचे बोलणे फोनवरून मोठ्या भावासोबत केले होते. यात तो राकेश सोबत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याचा फोन सातत्याने बंद आला व तो घरीही परतला नाही. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे पंजाब जावळे यांचे गावातीलच दोन ते तीन जणांवर संशय आहे. आठ दिवसात या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अन्यथा ग्रामस्थांसोबत स्वतः आमरण उपोषण करण्याचा इशाराही पंजाब जावळे यांनी दिला आहे.