खुटसावरी टेकडीच्या अवैध उत्खननाची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:25 AM2021-05-31T04:25:55+5:302021-05-31T04:25:55+5:30
खुटसावरी ग्रामपंचायतीने २०१६ मध्ये गट क्रमांक १२३ आराजी १.४२ हेक्टर आर पैकी आराजी १.२० हेक्टर आर क्षेत्रात दगड, गिट्टी, ...
खुटसावरी ग्रामपंचायतीने २०१६ मध्ये गट क्रमांक १२३ आराजी १.४२ हेक्टर आर पैकी आराजी १.२० हेक्टर आर क्षेत्रात दगड, गिट्टी, मुरुम, मलबा, खनीपट्टा मंजूर करण्यासाठी ठराव घेतला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रान्वये सर्व्हे नं. १२३ आराजी १.४२ हेक्टरपैकी १.२० हेक्टर आर टेकडी क्षेत्र खनिज उत्खननासाठी आदेश दिला. मात्र, आता टेकडी परिसरात एक फलक लावण्यात आला. त्यात २५ नोव्हेंबर २०१६ च्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कालावधी ८ डिसेंबर २०१६ ते ७ डिसेंबर २०२६ पर्यंत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने पाच वर्षांसाठी मंजुरीचा ठराव घेतला असला तरी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश हा दहा वर्षांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. सद्य:स्थितीत टेकडीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दगड गेल्याने पिकाचे नुकसान होत आहे. रस्त्याची वाट लागली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, परवाना रद्द करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम, दिनेश वासनिक, सरपंच मनीषा वासनिक, सदस्य ज्योती नंदेश्वर, प्रियंका सार्वे, मनोज वासनिक, सुरेश सार्वे, बाबुलाल वासनिक उपस्थित होते.
बॉक्स
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
ग्रामपंचायतीच्या ठरावाला झुगारून तत्कालीन जिल्हाधिकारी आपल्या आदेशाने उत्खननाची मर्यादा वाढवून देऊ शकतात काय? त्या ठरावावर खोडतोड केली आहे काय? लीजधारकाने अटी, शर्तीचे पालन न करता उत्खनन केल्यानंतरही जिल्हा प्रशासनातील बडे अधिकारी लीजधारकावर मेहरबान आहेत काय, असे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे चर्चा केली असता त्यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले. या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा खनिकर्म अधिकारी राजविलास गजभिये यांनी दिले. आता चौकशीकडे लक्ष लागले आहे.