राफेल घोटाळ्याची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:02 PM2018-12-24T22:02:24+5:302018-12-24T22:02:39+5:30
राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात गैरव्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे. याच अंतर्गत सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निषेध व निर्दशने करीत जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधांना निवेदन पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात गैरव्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे. याच अंतर्गत सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निषेध व निर्दशने करीत जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधांना निवेदन पाठविण्यात आले.
देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा राफेल लढाऊ विमान घोटाळात करण्यात आला. राफेल विमान खरेदी घोटाळयामुळे सरकारी खजिना ४१,२०५ कोटी रूपयांनी झाला. ज्या विमानांची किंमत ५२६.१० कोटी रुपए होती ते विमान भाजप सरकार ने १६७०.७० करोड रूपयांनी खरेदी करण्यात आले. हिंदुस्थान एयरोनाटिक्स लिमिटेड या पब्लिक सेव-टर कंपनीला ठेका न देता १२ दिवस जुनी एका खाजगी कंपनीला सदर कंत्राट देण्यात आला. देशाला आवश्यक १२६ विमान कमी करून केवळ ३६ विमानांचा सौदा करण्यात आला. अशाप्रकारे देश हित देशाची सुरक्षाच्या सबंधी भाजपा प्रणित सरकारने माहाघोटाळा केला तरी या राफेल लढाऊ विमान खरेदी घोटाळयाची सयुक्त संसदीय समितीमार्फत चोकशी करण्यात येवून दोषींवर त्वरीत कारवाई करण्यात यावी.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार सेवक वाघाये, माजी आमदार आनंदराव वंजारी, जि. प. अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रदेश महासचीव जिया पटेल, माजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुकर लिचडे, महीला अध्यक्ष सिमा भुरे, जिल्हा परिषदेचग सभापती प्रेम वनवे, भंडारा तालुका कॉग्रेस अध्यक्ष राजकपूर राऊत, लाखांदूर तालुका कॉग्रेस अध्यक्ष भुमेश्वर महावाडे, तुमसर तालुका कॉग्रेस अध्यक्ष शंकर राऊत, साकोली तालुका कॉग्रेस अध्यक्ष नंदू समरीत, तुमसर शहर कॉग्रेस अध्यक्ष अमर रगडे, भंडारा शहर कॉग्रेस अध्यक्ष सचीन धणमारे, सेवादल अध्यक्ष कैलाश भगत, विकास राऊत, सभापती निलकंठ टेकाम, अनीक जमा, आवेश पटेल, गिता बोकडे, सुनील गिहेपुंजे, न.प. सदस्य शमिम शेख, न.प. सदस्य जयश्री बोरकर, जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, माजी सभापती हंसाताई खोब्रागडे, जि.प. सदस्य मंदा गनवीर, जि.प. सदस्य दिपक मेंडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.