'त्या' बांधकामाची चौकशी करा

By admin | Published: November 4, 2016 01:01 AM2016-11-04T01:01:08+5:302016-11-04T01:01:08+5:30

तालुक्यातील टेकेपार पुनर्वसन येथे नवबौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता व नाली बांधकामाची चौकशी करावी,

Investigate 'those' constructions | 'त्या' बांधकामाची चौकशी करा

'त्या' बांधकामाची चौकशी करा

Next

सीईओंना निवेदन : ग्रामस्थांची मागणी
भंडारा : तालुक्यातील टेकेपार पुनर्वसन येथे नवबौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता व नाली बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिले आहे.
निवेदनात नमुद केल्याप्रमाणे टेकेपार पुनर्वसन येथे सन २०१३-१४ मध्ये नवबौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम मंजुर करण्यात आले होते. सदर बांधकाम चंद्रभान घरडे ते भाऊराव शेंडे यांच्या घरापर्यंतच्या मार्गावर हे बांधकाम होते. परंतु मंजुर झालेला रस्ता व नाली बांधकाम काम न करता ग्रामसेवक तथा अभियंत्यांनी संगनमत करून पैशाची उचल केली, असा आरोप दिलीप पडोळे, माणिक वंजारी, अंकोश पडोळे, राजु कुंभलकर, अभिमन पडोळे व अन्य ग्रामस्थांनी केला आहे. या बांधकामाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी व रक्कम वसुल करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी ग्रामवासीयांनी आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला असून कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Investigate 'those' constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.