चौकशी समितीने दिली क्लिन चीट

By Admin | Published: February 4, 2016 12:32 AM2016-02-04T00:32:59+5:302016-02-04T00:32:59+5:30

राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार प्राप्त पचारा (नवेगाव) ग्रामपंचायतीत तत्कालीन सरपंचानी व समित्यांनी तंटामुक्ती ....

Investigating committee gave clean chit | चौकशी समितीने दिली क्लिन चीट

चौकशी समितीने दिली क्लिन चीट

googlenewsNext

विस्तार अधिकाऱ्यांनी केली चौकशी : प्रकरण ग्रामपंचायतीमधील अफरातफरीचा
तुमसर : राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार प्राप्त पचारा (नवेगाव) ग्रामपंचायतीत तत्कालीन सरपंचानी व समित्यांनी तंटामुक्ती पुरस्काराची रकमेची अफरातफर केल्याचा आरोप तंटामुक्ती समितीने केला होता. चौकशी समितीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना क्लिन चीट दिली. यामुळे विरोधकांना चपराक बसली.
पचारा गावाला राज्य शासनाकडून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचा २००९-१० मध्ये प्राप्त झाला होता. तत्कालीन सरपंच टी. डी. शरणागत यांनी प्राप्त रकमेतून १० हजार रुपयांचा साऊंड सर्व्हीस खरेदी करिता बँकेतून काढले होते. यात ५५०० रुपयांचा साऊंड सर्व्हीस खरेदी केली व ४५०० रुपये शिल्लक म्हणून ग्रामपंचायतीत जमा केले. ४५०० रुपयांचा अफरातफर केल्याची तक्रार तंटामुक्ती सदस्यांनी खंडविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. त्या अनुषंगाने सोमवारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पी. व्ही. ठवरे यांनी पचारा येथे चौकशी केली. तक्रारकर्त्यांना यावेळी बोलविण्यात आले, परंतु ते अनुपस्थित राहिले.
उर्वरित ४,५०० रुपये शिल्लक म्हणून नमूना १८ येथे आढळली ही खरेदी जनमुख योजनेतून करण्यात आली असे निदर्शनास आले. सन २०१०-११ मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या गावाला विकास रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. सन २०१२ मध्ये तत्कालीन सरपंच अविरोध निवडून आले होते. चौकशीत ४५०० ही रक्कम ग्रामपंचायत खात्यावर जमा झाल्याची नोंद सन २०१२ च्या ग्रामसभेच्या प्रोसीडींग, कॅशबुक, व्हाऊचर, पासबुक, रेकॉर्ड मध्ये सर्व नोंद आहेत.
(तालुका प्रतिनिधी)

४५०० रुपये ग्रामपंचायत खात्यात जमा असल्याच्या नोंदी आढळल्या त्याच्या नमूना १८ मध्ये नोंदी आहेत. तक्रारकर्त्यांना बोलविले होते. परंतु ते सर्व गैरहजर होते. त्या सर्वांचे बोलावून बयाण घेण्यात येईल. या प्रकरणाचा अहवाल खंडविकास अधिकाऱ्यांना दिला जाईल.
- पी. व्ही. ठवरे, विस्तार अधिकारी पंचायत समिती तुमसर
गावाला देशाच्या राजधानीपर्यंत विकास कामांनी ओळख व पुरस्कार प्राप्त करुन दिला. चौकशीत मला क्लिन चीट मिळाली. हेतुपुरस्पर आरोप व तक्रार करण्यात आली. याप्रकरणी मी न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे.
- टी. डी. शरणागत, तत्कालीन सरपंच, पचारा/नवेगाव

Web Title: Investigating committee gave clean chit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.