गोसे फाटा ते विरली रस्ता देतोय अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:00 PM2018-09-21T22:00:51+5:302018-09-21T22:01:09+5:30
पवनी तालुक्यातील गोसे फाटा ते सोनेगाव रस्त्याची दैयनीय अवस्था निर्माण झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण नाहीसे होऊन मोठमोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. येथील सरपंच रविकांत आरीकर यांनी रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले तरीही मात्र याकडे दुर्लख केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालोरा : पवनी तालुक्यातील गोसे फाटा ते सोनेगाव रस्त्याची दैयनीय अवस्था निर्माण झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण नाहीसे होऊन मोठमोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. येथील सरपंच रविकांत आरीकर यांनी रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले तरीही मात्र याकडे दुर्लख केले जात आहे.
एखाद्याचा जीव गेल्यावर रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
गोसे फाटा ते विरली खंदार रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ५ किमी रस्त्यावर पावसाळ्यात खड्यात पाणी साचल्याने चार चाकी तर दुरच पायी सुध्दा चालता येत नाही. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
याच रस्त्याने विद्यमान आमदार रामचंद्र अवसरे यांचे ब-याच वेळी आगमन झाले परंतू त्याचे सुध्दा याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. संबंधित विभागाने तात्काळ याकडे लक्ष दयावे अशी मागणी येथील अतूल मेश्राम, संगणक परिचालक, मनुश्वर आरीकर, गंगाधर आजबले व ग्रामस्थांनी केली आहे.