पवनारा पूल देतोय अपघातास आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 09:50 PM2018-07-28T21:50:32+5:302018-07-28T21:50:54+5:30

तुमसर - कटंगी (बालाघाट) आंतराज्यीय मार्गावरील पवनारा शिवारातील पूल धोकादायक ठरत असून आतापर्यंत येथे अनेक अपघात घडले आहेत. दोन दिवसापूर्वी सदर पूलाजवळ कोळसा वाहून नेणारा ट्रक उलटला होता. जुन्या पूलाजवळच नवीन पूल समांतर बांधला आहे. नवीन पूलावर प्रवेश करताना रस्त्यावर खचका पडला आहे. वळणमार्गावर पूल असल्याने काही वाहने जुन्या पूलाच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे येथे अपघातात वाढ होत आहे.

Invitation to Accidental Pavilion Bridge | पवनारा पूल देतोय अपघातास आमंत्रण

पवनारा पूल देतोय अपघातास आमंत्रण

Next
ठळक मुद्देवळणमार्गावरील पूल : ब्रिटीशकालीन पूल पाडले, जुने पोचमार्ग धोकादायक
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर - कटंगी (बालाघाट) आंतराज्यीय मार्गावरील पवनारा शिवारातील पूल धोकादायक ठरत असून आतापर्यंत येथे अनेक अपघात घडले आहेत. दोन दिवसापूर्वी सदर पूलाजवळ कोळसा वाहून नेणारा ट्रक उलटला होता. जुन्या पूलाजवळच नवीन पूल समांतर बांधला आहे. नवीन पूलावर प्रवेश करताना रस्त्यावर खचका पडला आहे. वळणमार्गावर पूल असल्याने काही वाहने जुन्या पूलाच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे येथे अपघातात वाढ होत आहे.
आंतरराज्यीय मार्ग हा वर्दळीचा असून पवनारा शिवारातील पूलाजवळ सतत अपघातात वाढ होत आहे. अपघात प्रवणस्थळ म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. ब्रिटीशकालीन पूल येथे यापूर्वी होता. आयुष्य संपल्याने येथे नवीन पूल तयार करण्यात आला. जुने पूल त्यानंतर पाडण्यात आले. परंतु जुन्या पूलांचे पोचमार्ग मात्र तसेच ठेवण्यात आले. दोन्ही मार्गावर डांबरीकरण असल्याने भरधाव वाहने जुन्या पोचमार्गावरूनच जातात. अचानक त्यांना रस्ता बंद दिसतो. यामुळे वाहने अनियंत्रित होवून अपघाताची येथे शक्यता बळावली आहे. नवीन पूलावर प्रवेश करताना दोन्ही बाजूला मोठे खचके पडले आहेत. भरधाव वाहने या खचक्यातून उसळी घेतात. येथे वाहने अनियंत्रित होवून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. रस्ता व पूल एकमेकास समांतर करण्याची गरज येथे आहे. दोन्ही बाजूच्या डांबरी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी डांबरीकरण उखडले आहे. वळणमार्गावरील पोचमार्ग (पूल) दुरुस्ती करण्याची गरज आहे. वळणावर पूल असल्याने तो धोकादायक ठरू नये, याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी घेण्याची गरज आहे.

पवनारा शिवारातील पुलाच्या पोचमार्गावर खचके पडले असून ते धोकादायक आहे. जुने पुल पाडल्यानंतर जुना पोचमार्गही उध्वस्त करण्याची गरज होती. पोचमार्गाच्या दोन्ही बाजूला सूचना फलक लावण्याची गरज आहे. येथे नेहमीच अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे.
-संगीता सोनवाने
जिल्हा परिषद सदस्य, चिखला

Web Title: Invitation to Accidental Pavilion Bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.