लोखंडी सळाखी चोरणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 09:32 PM2018-11-19T21:32:50+5:302018-11-19T21:33:15+5:30
येथील खात रोडवरील बांधकामावरून लोखंडी सळाखी लंपास करणाऱ्या चोरट्याला भंडारा पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली. त्याच्याकडून चार लाख २२ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील खात रोडवरील बांधकामावरून लोखंडी सळाखी लंपास करणाऱ्या चोरट्याला भंडारा पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली. त्याच्याकडून चार लाख २२ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी दिली.
निलज जगदीश गोस्वामी (३९) रा. बंगाली कॉलोनी भंडारा असे आरोपीचे नाव आहे. शहरातील खात रोडवरील तुळजा भवानी मंदिर परिसरात प्रफुल आसाराम श्यामकुंवर रा. नागपूर यांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर चार हजार ५०० किलो लोखंडी सळाखे ठेवलेल्या होत्या. १५ नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्याने लोखंडी सळाखी नेण्याचे दिसून आले. याबाबत दुसºयादिवशी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास पथक तयार करून शोध सुरू केला. त्यावेळी एका वाहनाने लोखंडी सळाखी नेण्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी आरोपी निलजला त्याच्या घरून अटक केली. तसेच दहेगाव येथून एक लाख २२ हजार रूपयांच्या लोखंडी सळाखी आणि गुन्ह्यात वापरलेली मालवाहू गाडी असा चार लाख २२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे, पोलीस हवालदार पुरूषोत्तम शेंडे, बाबुराव भुसावळे, साजन वाघमारे, अतुल मेश्राम, अजय कुकडे, संदीप बन्सोड, कृष्णा कातकाडे यांनी केली. विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षक खाडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.