तुमसरात सिमेंट रस्ता, नाली बांधकामात अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:39 AM2021-08-28T04:39:45+5:302021-08-28T04:39:45+5:30

माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत दिलेल्या माहितीनुसार, अंदाजपत्रकात नमूद असल्याप्रमाणे कन्सल्टन्सी चार्जेस/डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट पिप्रेशन चार्जेस दोन लक्ष ...

Irregularities in cement road, drain construction in Tumsarat | तुमसरात सिमेंट रस्ता, नाली बांधकामात अनियमितता

तुमसरात सिमेंट रस्ता, नाली बांधकामात अनियमितता

Next

माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत दिलेल्या माहितीनुसार, अंदाजपत्रकात नमूद असल्याप्रमाणे कन्सल्टन्सी चार्जेस/डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट पिप्रेशन चार्जेस दोन लक्ष पंच्यांशी हजार रुपये प्रति किलोमीटर खर्च करूनही चैनलप्रमाणे कॅरज-वे बांधकाम करण्यात आले नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्त्यालगतच्या कॅरेज-वे दोन्ही बाजूला नाल्यांचे बांधकाम करताना नालीचे जुने बांधकाम संपूर्ण न करता जुन्या नालीवरच तात्पुरती ड्रिल करून लोखंडी सळाख घालून बांधकाम नवीन दिसेल, अशा दोषपूर्ण व निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले. अंदाजपत्रकात नमूद असल्याप्रमाणे बेड स्लॅब व इतर कामे झालेलेच नाही. अशा सदोष काम केल्यामुळे नाल्यांचे स्लोप डिटेल पिप्रेशन रिपोर्ट किंवा अंदाजपत्रकानुसार एका लेव्हलमध्ये आले नाही. या कारणामुळे नाल्यांमधून वाहणारा सांडपाणी पुढे वाहून न जाता त्याच ठिकाणी जमा होईल व त्या कारणामुळे परिसरातील लोकांचा आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले. त्यामध्ये अंदाज पत्रकानुसार कुठल्याही प्रकारचे सबग्रेट अर्धा मीटर ग्रेन्युलर सब बेस सहा इंच, ड्राय लिन काँक्रेट डी एल सी. ४ इंच, पेओमेंट क्वालिटी काँक्रेट पी. क्यू सी. १० इंच जाळी स्थूलता, थिकनेस यामध्ये अनियमितता व बरेचसे दोष आढळून आले आहे. याची थिकनेस व्यवस्थित दिसून येत नाही. डोवेल बार वापरले गेले की नाही अशी शंका उपस्थित होते. तसेच पीक्यूसी थिकनेस बरोबर नसल्याने रस्त्याची लेव्हल एकसारखी समांतर मिळत नसून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहतो.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झालेल्या बांधकामात कुठल्याही प्रकारचे नियंत्रण किंवा कामाबद्दल निर्देश देणारे संबंधित अभियंता कन्ट्रक्शन साईटवर आढळून आले नाही. या कामांची चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तक्रारीच्या अनुषंगाने मौका चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या पत्राची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग नागपूर आणि जिल्हाधिकारी, भंडारा यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, शाखा प्रमुख निखिल कटारे, अरुण डांगरे, तुषार लांजेवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Irregularities in cement road, drain construction in Tumsarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.