कोंढी स्मशानघाट रस्त्याच्या बांधकामात अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:27 AM2021-06-04T04:27:18+5:302021-06-04T04:27:18+5:30
लेखा शीर्ष ३०५४ विशेष दुरुस्ती अंतर्गत मौजा कोंढी येथे स्मशान घाट रस्ता ग्रा.म २२४ येथील झालेले रस्ता व हरीजन ...
लेखा शीर्ष ३०५४ विशेष दुरुस्ती अंतर्गत मौजा कोंढी येथे स्मशान घाट रस्ता ग्रा.म २२४ येथील झालेले रस्ता व हरीजन वस्ती रस्ता ग्रा.म.२०८ आणि सीमा रस्ता १११ मध्ये तीन इंची वेअरिंग कोट ऐवजी एक इंची वेअरिंग कोट करण्यात आला. सहा इंच पीसीसी ऐवजी ८ इंच पीसीसी करण्यात आले. लोखंडी जाळी टाकण्यात आले नाही. जागा समतोल न करता सिमेंट रस्ता तयार करण्यात आले. मातीयुक्त रेतीचा वापर करण्यात आले. सदर कामाची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुमेध शामकुंवर यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
या तक्रारीची चौकशीकरिता बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता राऊत, शाखा अभियंता अडसर कोंढी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुमेध शामकुंवर, सरपंच उरकुडा गोंडणे, ग्रामसेवक गजभिये, राहुल ठाकरे, विनोद दुरुगकर, प्रदीप नेवारे, नरेंद्र चोपकर, अमृत मते उपस्थित होते.