पेट्रोलपंप गट्टू लावण्याच्या कामात अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:24 AM2021-06-26T04:24:55+5:302021-06-26T04:24:55+5:30
दहा वर्षांपासून ठाणा राष्ट्रीय महामार्गालगत आयुध निर्माणी पतसंस्थेद्वारा चालविण्यात येणाऱ्या भारत पेट्रोलपंप परिसरात पंपाचे बांधकाम काम रेंगाळलेल्या स्थितीत ...
दहा वर्षांपासून ठाणा राष्ट्रीय महामार्गालगत आयुध निर्माणी पतसंस्थेद्वारा चालविण्यात येणाऱ्या भारत पेट्रोलपंप परिसरात पंपाचे बांधकाम काम रेंगाळलेल्या स्थितीत होते. ‘लोकमत’ने येथील समस्यांविषयी वारंवार आपल्या दैनिकात बातमी प्रसारित केली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत मागील आठवड्यापासून कामाला सुरुवात करण्यात आली. यात छताचे काम व परिसरात गट्टू लावण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र गट्टू लावण्यामध्ये काळी चुरीऐवजी रेतीचा वापर केला गेला. परिणामी पेट्रोल भरणाऱ्या दोन मशिनीदरम्यान गट्टू लावलेल्या ठिकाणी गड्डा पडला. परिणामी सदर काम हे निकृष्ट असल्याचे आढळून येत आहे. संबंधित विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. याबाबत आयुध निर्माणी कर्मचारी पतसंस्था अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.