महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:45 AM2017-12-26T00:45:07+5:302017-12-26T00:45:21+5:30

तुमसर तालुक्यातील हरदोली (आं) येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामांतर्गत रस्त्याच्या कामावर मुरुम खननाची परवानगी दावेझरी घेतली. परंतु प्रत्यक्षात हरदोली येथील झुडपी जंगल परिसरातून जेसीबीने ८१५ ब्रास मुरुम खनन करण्यात आले.

Irregularities in the work of Maharashtra Employment Guarantee Scheme | महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता

महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता

Next
ठळक मुद्देहरदोली येथील प्रकार : यंत्राने केली कामे, झुडपी जंगलातून मुरुम खनन

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर तालुक्यातील हरदोली (आं) येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामांतर्गत रस्त्याच्या कामावर मुरुम खननाची परवानगी दावेझरी घेतली. परंतु प्रत्यक्षात हरदोली येथील झुडपी जंगल परिसरातून जेसीबीने ८१५ ब्रास मुरुम खनन करण्यात आले. मुरुम ट्रॅक्टरने पसरविण्यात आला. याप्रकरणाची तक्रार माजी सरपंच रविदयाल पटले यांनी खंड विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
हरदोली (आं) येथे मग्रारोहमी योजनेंतर्गत पाच रस्त्याचे मातीकाम पूर्ण झाले. त्या रस्त्यावर मुरुम घालण्याकरिता मौजा दावेझरी येथील गटक्रमांक २५१/२ ची ८१५ ब्रास मुरुम काढण्याची परवानगी तुमसर तहसीलदारांकडून आदेश क्रमांक २७९, २८०, २८३ एमएमएल ३०-२०१६-२०१७ नुसार घेण्यात आली. परंतू वरील जागेतून मुरुम खनन न करता मौजा हरदोली येथील गट क्रमांक २५२ झुडपी जंगल परिसरातून सुमारे ८१५ ब्रास जेसीबीने काढण्यात आले. हे मुरुम ट्रॅक्टरच्या मदतीने रस्त्यावर पसरविण्यात आले. यामुळे मजुरांना खोदकाम व मुरुम पसरविण्याच्या कामापासून वंचित ठेवले. नियमानुसार मग्रारोहयोची कामे मजुरांकडून करण्याचे शासनाचे आदेश आहे. त्यांना डावलून येथे कामे करण्यात आली. एम.बी. रेकॉर्ड करताना दावेझरी ते हरदोली ६ कि.मी. चे अंतर दाखविले तथा मजुरांना खोटे मस्टर तयार केल्याची शक्यता आहे. हरदोली येथे लाभार्थ्यांना दुसºयांदा घरकुल देण्यात आले असून शासकीय व माझ्या स्वत:च्या जागेत घरकुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. याची लेखी तक्रार दिली आहे. अद्यापपर्यंत येथे चौकशी व कारवाई झाली नाही. ग्रा.पं. नमुना आठ मध्ये कुणाला घरकुल मिळाले आहे व कुणाचे घर शासकीय जागेत आहे याची नोंद आहे. शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या घरातील ४२ लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी १२ हजारांचा लाभ दिला आहे. येथे सर्रास नियमांचा उल्लंघन करून संबंधितांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच रवीदयाल पटले यांनी केली आहे. सदर तक्रारीची प्रत तहसीलदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, भंडारा यांचेकडेही करण्यात आली आहे.

Web Title: Irregularities in the work of Maharashtra Employment Guarantee Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.