१२ हजार हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 01:10 AM2019-07-20T01:10:18+5:302019-07-20T01:10:53+5:30
जिल्हयातील धारगाव उपसा सिंचन प्रकल्पातील पहिल्या टप्याचे काम गतिमान करण्यासाठी सात महिन्यापुर्वी शासनाने निर्देश दिले होते. मात्र या कामांना गती नसल्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या लक्षात आले. यात जलसंपदा, मदत पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, गोसेखुर्द प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांची बैठक घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हयातील धारगाव उपसा सिंचन प्रकल्पातील पहिल्या टप्याचे काम गतिमान करण्यासाठी सात महिन्यापुर्वी शासनाने निर्देश दिले होते. मात्र या कामांना गती नसल्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या लक्षात आले. यात जलसंपदा, मदत पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, गोसेखुर्द प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी तात्काळ सर्वेक्षण करुन १५ दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकल्पामुळे भंडारा जिल्हयातील जवळपास १२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना धारगांव उपसा सिंचन टप्पा-१ व टप्पा-२ याबद्दल सुध्दा युध्द पातळीवर कार्यवाही करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. शासनाकडे प्रलंबित बाबींवर तातडीने निर्णय घेवून प्रकल्पांचे कामकाज सुरु होईल यादृष्टीने कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री डॉ.फुके यांनी दिले.शेकडो गावांना फायदा होणार आहेत. यामध्ये जवळपास १ लाख पेक्षा जास्त शेतकरी आपली शेती ओलीत करुन भरघोस उत्पन्न घेवू शकेल. तसेच भंडारा जिल्हयाची ओळख ही जलयुक्त जिल्हा म्हणून ओळखले जाणार. या प्रकल्पाला पालकमंत्री यांनी गती दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकल्पांसोबतच गोसेखुर्द धरण प्रकल्पावरील हत्तीडोई उपसा सिंचन उपसा सिंचन प्रकल्पास मंजुर प्रदान करण्यासंदर्भात येणाºया अडचणी दूर करुन येत्या १५ दिवसात कारवाई करण्याबाबत सुध्दा स्पष्ट सुचना देण्यात आल्या. या बैठकीमध्ये आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, कार्यकारी संचालक सुर्वे, अवर सचिव, महसूल व वन विभाग, कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द पुनर्वसन प्रकल्प, शाखा अभियंता यांच्यासह जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.