सिंचन प्रकल्पात पाण्याचा उपसा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 05:00 AM2020-07-17T05:00:00+5:302020-07-17T05:01:05+5:30

यंदा चांदपूर जलाशयात असणारे पाणी उजवा कालवा अंतर्गत १७ गावांना उन्हाळी धान पिकाच्या लागवडसाठी वितरीत करण्यात आले. गत वर्षात प्रकल्पाने पाणी उपसा केल्याने यंदा उन्हाळी हजार हेक्टर आर शेत शिवारात धान पिकाचे उत्पादन घेण्यात आले. उन्हाळी धान पिक आणि टेलवरील गावांना जिकरीने पाणी वाटप करण्यात आले. यामुळे धानाचे विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे.

Irrigation project starts pumping water | सिंचन प्रकल्पात पाण्याचा उपसा सुरु

सिंचन प्रकल्पात पाण्याचा उपसा सुरु

Next
ठळक मुद्दे सोंड्याटोलाचे दोन पंपगृह सुरु : पाच दुरुस्त, चार पंपगृह नादुरुस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदीवरील महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात चांदपूर जलाशयात पाण्याचा उपसा करण्याचे निर्देश देण्यात आली आहे. बुधवारी दोन पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला असून पाण्याची पातळी वाढताच उर्वरित तीन पंपगृह सुरु करण्यात येणार आहे.
बावनथडी नदीवरील महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पासाठी शासनाने ११० कोटी रुपये खर्च केले आहे. पावसाळ्यात नदी पात्रातील पाण्याचा उपसा चांदपूर जलाशयात करण्यात येत आहे.
यंदा चांदपूर जलाशयात असणारे पाणी उजवा कालवा अंतर्गत १७ गावांना उन्हाळी धान पिकाच्या लागवडसाठी वितरीत करण्यात आले. गत वर्षात प्रकल्पाने पाणी उपसा केल्याने यंदा उन्हाळी हजार हेक्टर आर शेत शिवारात धान पिकाचे उत्पादन घेण्यात आले.
उन्हाळी धान पिक आणि टेलवरील गावांना जिकरीने पाणी वाटप करण्यात आले. यामुळे धानाचे विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे. यानंतर चांदपूर जलाशयात असणाºया पाण्याचे पातळीत घट झाली आहे. ३६ फुट पाणी साठवणूक करण्याची क्षमता असणाऱ्या जलाशयात केवळ १७ फुट पाणी शिल्लक होते. यामुळे पावसाळा सुरु झाला असतांना जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. अल्प पावसामुळे शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली आहे. चांदपूर जलाशयाचे पाणी रोवणीसाठी देण्याची मागणी सुरु केली असता निर्णय घेण्यात आलेला नाही.
पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांची मंजुरी आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अद्यापपर्यंत हिरवा कंदील दाखविण्यात आलेला नाही. दरम्यान नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग होत असतांना पंपगृहाने उपसा सुरु करण्यात विलंब होत आहे. त्यामुळे शेतकरी व विरोधकांनी डोक्यावर घेतले. यामुळे बुधवारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपसा सिंचन प्रकल्पात भेट देवून पाहणी केली आहे. यानंतर पंपगृह सुरु करण्याचे निर्देश दिले आहे. दुपारी १२ वाजता दोन पंपगृह सुरु करण्यात आले असून नदी पात्रात पाण्याची पातळी वाढताच उर्वरीत तीन पंपगृह सुरु करण्यात येणार आहेत. दरम्यान या प्रकल्प स्थळात नादुरुस्त चार पंपगृह गत अनेक वर्षापासून आहेत. कंत्राटदार पाच पंपगृह सुरु केल्याचे तुणतुणे वाजवित आहे. या कंत्राटदाराला देयकाचे अनुदान वितरीत करण्यात येत आहे. परंतु नादुरुस्त पंपगृह दुरुस्तीसाठी विभाग दबाव निर्माण करीत नाही.
प्रकल्प स्थळातील पंपगृहात ठिकठाक चित्र नसतांना एकाच कंत्राटदारावर सिंचन विभागाची चार वर्षापासून कृपादृष्टी असल्याने बरेच काही सांगून जात आहे. यामुळे प्रकल्प स्थळाचे अस्तित्व धोक्यात आले असून उर्वरीत पंपगृह तत्काळ दुरुस्तीची आवश्यक आहे.

पाण्याच्या साठवणूकीसाठी दबाव
बावनथडी नदीचे पात्र बारमाही वाहणारे नाही. पावसाळ्याचे तीन महिने नदी पात्रात पाणी दिसून येत आहे. या नदीला अन्य स्त्रोत नाहीत. पावसाचे पाण्यावर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे अस्तित्व आहे. यामुळे चांदपूर जलाशयात अधिक पाण्याची साठवणूक करण्यासाठी जलद गतीने पंपगृह सुरु करण्याकरिता दबाव निर्माण करण्यात आला आहे. निरंतर पंपगृह सुरु ठेवता येईल इतके पाणी सध्या नदीपात्रात उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा आहे.

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात पाणी उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जलाशयात पाणी साठवणूक होईल. रोवणीेरीता पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकाºयांची भेट शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेणार आहे.
- उमेश कटरे,
सरपंच, मोहगाव (खदान)
नदी पात्रात अल्प पाणी असल्याने पाणी उपसा करण्याकरिता धरणाचे दरवाजे बंद करण्याची गरज असून निरंतर पंपगृह सुरु ठेवता येईल. याकरिता निर्देश दिले पाहिजे.
- किशोर राहांगडाले,
सामाजिक कार्यकर्ता, बिनाखी

Web Title: Irrigation project starts pumping water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.