जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 05:00 AM2020-11-01T05:00:00+5:302020-11-01T05:00:27+5:30

मोहाडी आणि तुमसर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ता बैठकीत ते शनिवारी बोलत होते. खासदार पटेल म्हणाले, शेतकऱ्यांना गतवर्षी प्रमाणे यंदाही धानाला ७०० रुपये बोनस देण्यात येईल. धानाचे विक्रमी उत्पादन यावर्षी झाले. त्यामुळे अधिकची मदत अंदाजे १४०० कोटी रूपये बोनस शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, यासाठी जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रकल्पांचे काम पूर्णत्वास आली आहे.

Irrigation projects will be set up in the district | जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावणार

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावणार

Next
ठळक मुद्देप्रफुल पटेल क मोहाडी आणि तुमसर येथे राष्ट्रवादी पदाधिकारी-कार्यकर्ता सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील शेतकरी समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आपला मानस आहे. यासाठी आपण प्रयत्नरत आहो. जिल्ह्यातील सिंचन सुविधेत वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून प्रलंबित प्रकरणांची कामे लावण्यात येत आहे. यासाठी बावनथडी, सोंड्याटोला, धापेवाडा हे प्रकल्प पूर्ण करण्यात आले. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
मोहाडी आणि तुमसर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ता बैठकीत ते शनिवारी बोलत होते. खासदार पटेल म्हणाले, शेतकऱ्यांना गतवर्षी प्रमाणे यंदाही धानाला ७०० रुपये बोनस देण्यात येईल. धानाचे विक्रमी उत्पादन यावर्षी झाले. त्यामुळे अधिकची मदत अंदाजे १४०० कोटी रूपये बोनस शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, यासाठी जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रकल्पांचे काम पूर्णत्वास आली आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे, असे खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागल्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी शासनातर्फे धानाला २५८८ रुपये बोनससह भाव मिळवून दिल्याबद्दल शेतकऱ्यांकडून खासदार प्रफुल पटेल यांचे आभार मानण्यात आले.
सभेला आमदार राजू कारेमोरे, माजी मंत्री राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, तुमसर विधानसभा अध्यक्ष विठ्ठल कहालकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत सोनकुसरे, तालुकाध्यक्ष वासूदेव बांते, जिल्हा युवती अध्यक्ष नेहा शेंडे, केशवराव बांते, मनिषा गायधने, श्रीधर हटवार, युमताई राखडे, सदाशिव ढेंगे, प्रदीप बुराडे, पुरूषोत्तम पातरे, आनंद मलेवार, भुपेंद्र पवनकर, बाबुराव मते, किरण अतकरी, बबलू सैय्यद, खुशाल कोसरे, नरेंद्र पिकलमुंडे यांच्यासह तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक वासू बांते यांनी संचालन विजय पारधी यांनी तर आभार खुशाल कोसरे यांनी मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इतर पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्ते-ग्रामपंचायत सदस्यांनी प्रवेश केला. त्यात भाजयुमोचे गौरीशंकर पालांदूरकर यांच्यासह जीवन दमाहे, हरीदास शहारे, सुभाष बागडे, जितेंद्र दमाहे यांच्यासह अनेकांचा समावेश होता.

Web Title: Irrigation projects will be set up in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.