क्षमतेनुसार भात शेतीला सिंचन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:51 AM2018-09-21T00:51:44+5:302018-09-21T00:53:10+5:30

पेंच पेकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्यात आले तर टेलपर्यंत पाणी दोन दिवसात पोहचणे शक्य आहे. तसेच पेंचचे पाणी वितरण करण्यासाठी कामगार व पोलीस यंत्रणा लावण्यात यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Irrigation of rice cultivation by capacity | क्षमतेनुसार भात शेतीला सिंचन करा

क्षमतेनुसार भात शेतीला सिंचन करा

Next
ठळक मुद्देपत्रकार परिषद : ७२५ क्युसेक पाणी सोडण्याची किसान सभेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : पेंच पेकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्यात आले तर टेलपर्यंत पाणी दोन दिवसात पोहचणे शक्य आहे. तसेच पेंचचे पाणी वितरण करण्यासाठी कामगार व पोलीस यंत्रणा लावण्यात यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.
टेल टू हेड या नियमाप्रमाणे पाणी सोडण्या तयावे या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने पाच दिवसापासून तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या उपोषण सुर ुआहे. उपोषण दरम्यान पेंच प्रकल्पाचे जबाबदार अधिकाºयांनी उपोषण कर्त्यांना भेट दिली नाही. उलट पेंच कार्यालयाचा चतुर्थ कर्मचारी पाठवून शेतकºयांची टिंगल केली. पेंच प्रकल्पाचे २० सप्टेंबर रोजी पाणी सोडण्यात आले तरी शेवटच्या लाभक्षेत्रात दोन दिवसात पाणी पोहचेल या विषयी साशंकता व्यक्त केली.
त्यासाठी मोहाडी सहकारी खरेदी विक्री समिती मोहाडीच्या सभागृहात किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेला माधवराव बांते, मणिकराव कुकडकर, डॉ. प्रा. सुनिल चवळे, नितीन मोहारे, राजु उपरकर, जयप्रकाश मसर्के उपस्थित होते. पेंच प्रकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्याची मागणी करण्यात आली. पेंच कडून कालव्यात ७२५ क्युसेक पाणी सोडला पाहिजे. पण ५०० व त्यापेक्षा कमी क्युसेक पाणी सोडला जातो. त्यामुळे पाणी लवकर मिळत नाही.
तसेच टेल टू हेड या नियमाने कधी पाण्याचे वितरण केले जात नाही. शेवटच्या टोकावर दोन दिवसात पाणी पोहचण्यासाठी पेंच प्रशासन व पाणी वापर संस्थेने कामगार व पोलीस यंत्रणा लावली तरच योग्यवेळी पाणी मिळेल. अन्यथा असेच ढिसाळ व्यवस्थापन राहिले तर शेवटच्या टोकावर पाणी येण्यासाठी पंधरा दिवसाची शेतकºयांना प्रतिक्षा करावी लागेल. अशी शंका किसान सभेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. तोपर्यंत धानाचे गर्भ आटून उत्पादनावर परिणाम पडण्याची शक्यता असल्याचे ही सांगण्यत आले.
पेंच प्रशासनाने शेवटच्या टोकापर्यंत कधी पाणी येईल याची तारीख लेखी कळवावे. अन्यथा आता शेतकरी उपोषण करण्यासोबतच तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचाही इशारा किसान सभेच्यावतीने देण्यात आला. किसान सभेचा आंदोलन आजही सुरुच आहे. वाल्मीक मुटकुरे, बंडू पापडकर वसंता कस्तुरे उपोषणावर बसली आहेत. दरवर्षी दुरुस्तीच्या नावावर पैसा जातो. कुठे असा सवाल करीत कालव्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. याची चौकशी व्हावी अशी मागणी किसान सभेने पत्रकार परिषदेत केली. पेंच प्रकल्पाचे पाणी हेक्टर कार्यक्षेत्रानुसार सोडण्यात आले तर सिंचनासाठी वेळ लागणार नाही, असेही किसान सभेने म्हटले आहे.

Web Title: Irrigation of rice cultivation by capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती