पवनी तालुक्यातील मोखारा ग्रामपंचायतला मिळाले आयएसओ मानांकन
By युवराज गोमास | Published: August 19, 2023 02:04 PM2023-08-19T14:04:54+5:302023-08-19T14:05:38+5:30
ग्रामपंचायतीने केलेल्या कामांची पाहणी करीत अधिकाऱ्यांनी आयएसओ प्रमाणपत्र बहाल केले.
भंडारा : पवनी तालुक्यातील विविध उपक्रम राबवून नावारूपास असलेली स्मार्ट ग्रामपंचायत मोखारा (आदर्श) ला इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन अर्थात आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
मोखारा (आदर्श) येथील सरपंच प्रशांत भुते, उपसरपंच गिरीष नखाते, सचिव के. जे. दोनोडे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नामुळे गावाचा चेहरामाेहरा बदलला. मोखारा येथील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ व सुलभ सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणुन गावात माहिती फलक माहिती दिली गेली. गावात अनेक सोयी सुविधा उपलब्ध केल्या. यामुळे प्रशासन व नागरीकांना कामे करतांना त्रास होत नाही. ग्रामपंचायतीने केलेल्या कामांची पाहणी करीत अधिकाऱ्यांनी आयएसओ प्रमाणपत्र बहाल केले.
याप्रसंगी सरपंच प्रशांत भुते, उपसरपंच गिरीष नखाते, सचिव के. जे. दोनोडे, तंटामुक्ती अध्यक्ष राजू काटेखाये,सदस्य किशोर गिऱ्हेपुंजे, दिनेश बिलवणे, ज्योती नखाते, उर्मिला कांबले, कुसुम गिऱ्हेपुंजे, शालु बोरकर, शिपाई राकेश गिऱ्हेपुंजे, ऑपरेटर सुजाता नखाते आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि गावकरी उपस्थित होते.