ध्येयाशिवाय शिखर गाठणे अशक्य
By admin | Published: December 31, 2015 12:35 AM2015-12-31T00:35:03+5:302015-12-31T00:35:03+5:30
जीवन समृद्ध करण्यासाठी स्वप्न मोठी बघा. ती स्वप्ने प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा.
मोहाडी : जीवन समृद्ध करण्यासाठी स्वप्न मोठी बघा. ती स्वप्ने प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. भविष्यात जीवनातील सुखाची दारे आपोआप उघडली जातील. विद्यार्थिदशेतच जीवनाची ध्येय समोर असली पाहिजेत. उच्च ध्येय समोर ठेवल्याने जीवनात उंचीचे शिखर गाठणे सोपे जात, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्या अश्वनीता लेंडे यांनी केले.
महात्मा जोतिबा फुले हायस्कूल, मोहगाव देवी येथील वार्षिकोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष स्वाती हटवार यांनी केले. अध्यक्षस्थानी कौशल्या गोमासे या उपस्थित होत्या.
व्यासपीठावर अतिथी म्हणून मंदा घोडेश्वार, वंदना शहारे, कुसुम पंधरे, सविता आंबिलकर, सुलभा गेडाम, वृंदा लांजेवार, वर्षा ढोमणे, कुसूम पंधरे, सविता आंबिलकर, सुलभा गेडाम, वृंदा लांजेवार, वर्षा ढोमणे, शोभा कोचे, अनिता धुमनखेडे, मुख्याध्यापक आर.वाय. बांते, लिल्हारे, पेलने, धृपता पेलने, झंझाड, पंचवटे उपस्थित होत्या.
यावेळी पंचायत समिती सदस्या अश्वनीता लेंडे यांचा शाळेच्या वतीने शोभा कोचे, वर्षा ढोमणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांाठी वाद विवाद स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, हंडीफोड स्पर्धा, बॅगो तोडस्पर्धा, एकल नृत्य, समुहनृत्य आदी कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी केले. संचालन हेमराज राऊत यांनी तर आभार प्रदर्शन धनराज वैद्य यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रामुख्याने सर्व महिला अतिथींना निमंत्रित करण्यात आले होते.
गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाद्वारे प्रोत्साहित करण्याचे कार्य केले. विद्यार्थ्यांची कला जवळून पाहून विद्यार्थ्यांना रोख बक्षिसही देण्ळात आले. कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)