गरजूंना लाभ देणे तुमची जबाबदारी, प्रामाणिकपणे काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 05:00 AM2022-02-26T05:00:00+5:302022-02-26T05:00:17+5:30

भंडारा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती म्हणजेच दिशाची बैठक खासदार सुनील मेंढे  यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार रोजी नियोजन भवनात पार पडली. यावेळी खासदारांनी विविध विषयांचा आढावा घेत प्रसंगी अधिकाऱ्यांना जाबही विचारला. पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने मिळावा म्हणून कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून सकारात्मक कारवाई करावी.

It is your job to discover what that is and to bring it about | गरजूंना लाभ देणे तुमची जबाबदारी, प्रामाणिकपणे काम करा

गरजूंना लाभ देणे तुमची जबाबदारी, प्रामाणिकपणे काम करा

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासनातील विभागांचे आहे. अधिकाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करून योजनेचा लाभ मिळवून द्यावा. प्रसंगी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी तयार राहावे, असे खासदार सुनील मेंढे यांनी स्पष्ट केले आहे.
भंडारा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती म्हणजेच दिशाची बैठक खासदार सुनील मेंढे  यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार रोजी नियोजन भवनात पार पडली. यावेळी खासदारांनी विविध विषयांचा आढावा घेत प्रसंगी अधिकाऱ्यांना जाबही विचारला. पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने मिळावा म्हणून कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून सकारात्मक कारवाई करावी. तसेच पीक विमा कंपनीचा एक कर्मचारी कृषी कार्यालयात नेहमी ठेवण्याच्यादृष्टीने व्यवस्था करावी, अशी सूचनाही केली. मुद्रा लोन घेताना अनेक होतकरू तरुणांना अडचणी येत आहेत. यासाठी असलेल्या अटी शिथिल करून नवउद्योजकांना प्रेरणा देण्याच्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत. एका सदस्याने उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होत असलेल्या रेती चोरीवर निर्बंध घालण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश यावेळी खासदार मेंढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. रेती घाटाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना काम मिळावे यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना देताना खासदारांनी राज्यात चांगले काम करण्यासाठी रोहयोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. वैयक्तिक लाभाच्या गुरांच्या गोठ्यांचे नियोजन प्रत्येक पंचायत समिती स्तरावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्वांना घरे योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, आवास प्लस, राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना याअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे, असेही खासदार यांनी सांगितले. 
बैठकीला जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यासह सीईओ विनय मून, सदस्य विनोद बांते, प्रशांत खोब्रागडे, महेंद्र शेंडे, प्रकाश करंजेकर, डॉ. शांताराम चाफले, भोजराम कापगते, विलास डहारे, माधुरी नखाते, सेलोकर, बिसन सयाम, प्रकाश कुर्झेकर, हिरालाल वैद्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझडे व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

Web Title: It is your job to discover what that is and to bring it about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.