अंधश्रध्देचा नायनाट होणे गरजेचे
By admin | Published: January 5, 2016 12:39 AM2016-01-05T00:39:59+5:302016-01-05T00:39:59+5:30
श्रध्दाळू लोकांची फसवणूक करुन त्यांना गंडविण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अंधश्रध्देला बळी न पडता जागरुक राहावे, ...
अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळा : प्रिया शहारे यांचे प्रतिपादन
भंडारा : श्रध्दाळू लोकांची फसवणूक करुन त्यांना गंडविण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अंधश्रध्देला बळी न पडता जागरुक राहावे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असतांना अंधश्रध्देचा नायनाट होणे काळाची गरज आहे. यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या महिला संघटीका प्रिया शहारे यांनी केले.
पोलीस मुख्यालय येथील पोलीस सभागृहात रेझिंग डे च्या निमित्ताने आज, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित पोलिसांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) धात्रक उपस्थित होते. कार्यशाळेला प्रमुख वक्ते अंनिसचे जिल्हाध्यक्ष मदन बांडेबुचे, जिल्हा सचिव मुलचंद कुकडे, जिल्हा महिला संघटिका प्रिया शहारे उपस्थित होते. प्रास्ताविक मुलचंद कुकडे यांनी केले. त्यांनी तंत्र-मंत्र व जादुटोण्याच्या नावावर आतापर्यंत कितीतरी कुटुंब उध्वस्त झाले. कितीतरी निर्दोष लोकांचा बळी घेण्यात आला, असे त्यांनी विविध उदाहरणाद्वारे व प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले.
यावेळी प्रिया शहारे यांनी शिक्षित व अशिक्षित असे दोन्ही समाज अंधश्रद्धेने ग्रासले आहेत. काही समाजकंटक लोक समाजाला अंधश्रद्धेच्या जाळ्यात फासून आपला हेतू साध्य करीत आहेत. जगामध्ये तंत्र-मंत्र, भूत, प्रेत, जादूटोणा, चेटकीन वगैरे काही नसते. तंत्र-मंत्र, भूत प्रेत, जादूटोणा, चेटकीन यांच्या नावावर नाहक निर्देश व निष्पाप लोकंचा बळी घेतला जातो, असे त्यांनी विविध उदाहरणाद्वारे समजावून सांगितले.
मदन बांडेबुचे यांनी जे सत्य नाही ते सत्य आहे असे मानने आणि कोणतीही चौकशी न करता ते सत्य आहे असे मानने, म्हणजे अंधश्रद्धा होय. त्यांनी अंधश्रद्धेमुळे गुप्तधनासाठी लोकांनी कितीतरी निष्पाप लहान मुलांचे बळी घेतले आहेत, हे त्यांनी विविध उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. (नगर प्रतिनिधी)