पशुपालन व्यवसायातून शेतकऱ्यांचा विकास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 09:22 PM2018-10-14T21:22:41+5:302018-10-14T21:23:01+5:30

पशुपालक व शेतकरी यांचे आर्थिक स्त्रोताचे पशुपालन व्यवसाय मुख्य घटक आहे. या व्यवसायातून अनेक जण प्रगतीचे शिखरावर पोहचली असली तरी पशुधनाच्या संख्येने जलद गतीने होणारी घट चिंता निर्माण करणारी आहे. येत्या काही वर्षात केवळ चित्रावरच पशुधन दिसणार असल्याने शेतकऱ्यांनी पशुधनाची जोपासना व संगोपन करण्याची आश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर यांनी केले.

It is possible to develop farmers' livestock business | पशुपालन व्यवसायातून शेतकऱ्यांचा विकास शक्य

पशुपालन व्यवसायातून शेतकऱ्यांचा विकास शक्य

Next
ठळक मुद्देधनेंद्र तुरकर : सोनेगाव येथे पशुपालन कृती शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : पशुपालक व शेतकरी यांचे आर्थिक स्त्रोताचे पशुपालन व्यवसाय मुख्य घटक आहे. या व्यवसायातून अनेक जण प्रगतीचे शिखरावर पोहचली असली तरी पशुधनाच्या संख्येने जलद गतीने होणारी घट चिंता निर्माण करणारी आहे. येत्या काही वर्षात केवळ चित्रावरच पशुधन दिसणार असल्याने शेतकऱ्यांनी पशुधनाची जोपासना व संगोपन करण्याची आश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर यांनी केले.
सोनेगाव येथील ग्रामपंचायत प्रांगणात पशु वैद्यकीय दवाखाना सिहोरा अंतर्गत आयोजित जनावरांचे कृती शिबिरात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनमाला चांदेवार होत्या. उद्घाटन सभापती धनेंद्र तुरकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उमेश फुंडे, सिहोराचे सरपंच मधु अडमाचे, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. देशेट्टीवार, धनलाल चौहान, डॉ. टेकाम, डॉ. विजय झोडे, डॉ. प्रदिप तुमसरे उपस्थित होते.
कामधेनू दत्तक ग्रामने घोषित करण्यात आलेल्या सोनेगावात आयोजित जनावरांचे कृती शिबिरात २४७ जनावरांची तपासणी करण्यात आली. या जनावरांचे पशुपालकांना औषध आणि मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात वंधत्व जनावराची तपासणी, औषधी उपचार, खच्चीकरण, लसीकरण, गोचीळ निमूर्लन, औषध फवारणी, जंतनाशक औषधी आदी शेतकरी आणि पशु पालकांना वितरीत करण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस गावातील सहा पशुपालकांना सभापती धनेंद्र तुरकर यांचे हस्ते करण्यात आले. वैरण बियाणे, युट्रिकॉल, क्षारवित, क्षार, मिश्रण, मलमूत्र व्यवस्थापन अंतर्गत कल्चर, या करिता युरिया किट आदींचे पशुपालकांना वाटप करण्यात आले. यावेळी महिला पशु पालकांना सन्मानित करण्यात आले. गावात पशु पालन आणि दुग्ध व्यवसायातून आर्थिक विकास करण्यासाठी जनतेकरीता शासनस्तरावर अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. जनावराचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शासनस्तरावर पशु दवाखाने कार्यरत आहे. पशुपालक आणि शेतकरी यांना हा व्यवसाय महत्वाचे असून पशुधनाचे संख्येत वाढ करण्याची गरज असल्याचे आवाहन तालुका पशुधन विकास अधिकारी यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने पशुपालक व शेतकरी उपस्थित होते. संचालन डॉ. विजय झोडे यांनी तर, आभार प्रदर्शन डॉ. प्रदिप तुमसरे यांनी केले.

Web Title: It is possible to develop farmers' livestock business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.