खेळाने करिअर घडविणे शक्य आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:38 AM2021-08-22T04:38:11+5:302021-08-22T04:38:11+5:30
तायक्वांदो प्रशिक्षणात यशस्वी झालेल्या खेळाडूंना येलो व ग्रीन बेल्ट वितरण करण्यात आले. त्या वितरण कार्यक्रमात त्यांनी खेळाडूंना ...
तायक्वांदो प्रशिक्षणात यशस्वी झालेल्या खेळाडूंना येलो व ग्रीन बेल्ट वितरण करण्यात आले. त्या वितरण कार्यक्रमात त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. २००१ पासून मोहाडी येथील खेळाडू मास्टर नईम कुरेशी यांच्या मार्गदर्शनात सराव करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक प्रशिक्षक, खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडविले आहेत. त्यांच्या प्रयत्नाने अनेक खेळाडू शासकीय स्तरावर सुद्धा नोकरी करीत आहेत. तसेच त्यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात अनेक प्रशिक्षक विविध शाळेमध्ये आपली सेवा देत आहेत.
तायक्वांदो बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंना बेल्टचे वितरण करण्यात आले. यामध्ये रोली ढोमणे, श्रीरंजन ढोमणे, रुणझुण मोटघरे, स्वर्णिका गुरव, तृषान्त लांजेवार, राहुल मारबते, संचिता आठवले, हर्षाली चौधरी, पलक चव्हाण, जान्हवी गायधने, आर्या दीपटे, अरसलान शेख, प्रज्वलित घडले यांनी परिश्रमाने येलो बेल्ट प्राप्त केले. या सर्व तायक्वांदोपटूची नियुक्ती परीक्षक मास्टर नईम कुरेशी यांनी ग्रीन बेल्टसाठी केली आहे. तसेच पायल पाटील, हमजा कुरेशी, प्रसेनजित घडले, नील गायधने, रितिका बाभरे यांनी ग्रीन बेल्टची परीक्षा उत्तीर्ण करून ग्रीन बेल्ट प्राप्त केले. या सर्व तायक्वांदोपटूंची नियुक्ती परीक्षक मास्टर नईम कुरेशी यांनी सिनियर ग्रीन बेल्टसाठी केली आहे. यावेळी यांचे सराव प्रशिक्षक म्हणून दीपक लायनकिंग तायक्वांदो अकादमी मोहाडीचे मुख्य प्रशिक्षक दीपक बशीने व सहायक प्रशिक्षक पूर्वा गायधने यांची नियुक्ती राष्ट्रीय प्रशिक्षक व तायक्वांदो जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नईम कुरेशी यांनी केली, यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गायकवाड, उमाशंकर पटले, ज्ञानेश्वर हाके, सिराज शेख, नरेंद्र निमकर, राजू बांते, सदाशिव ढेंगे, यशवंत थोटे, सुनील मेश्राम, गिरीधर मोटघरे, अफरोज पठाण उपस्थित होते.
210821\img-20210811-wa0143.jpg
खेळाने करियर घडविने शक्य आहे
प्रशिक्षण : खेळाडूंना बेल्टचे वितरण