शेतकऱ्यांचे हित जोपासणे शासनाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 06:00 AM2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:00:56+5:30
नागपूर येथील मित्राय फॉर्मर्स प्रोड्यूूसर कंपनी आणि पुणे येथील युनिटी असोसिएट्स यांनी विविध कृषी उत्पादने निर्यात करण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. सहकार खात्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचे हित जोपासणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा हा अत्यंत कष्टाळू आणि निसगार्चे वरदान लाभलेला जिल्हा आहे आणि येथून भाजीपाला एक्सपोर्ट करणारे पहिले कंटेनर दुबईला जात आहे, ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. नागपूर येथील मित्राय फॉर्मर्स प्रोड्यूूसर कंपनी आणि पुणे येथील युनिटी असोसिएट्स यांनी विविध कृषी उत्पादने निर्यात करण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. सहकार खात्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचे हित जोपासणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
मोहाडी तालुक्यातील वडेगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या निर्यात उपक्रमाअंतर्गत समृद्धी मार्गाने दुबईला पाठविल्या जाणाºया १३ टन मिरचीच्या पहिल्या कंटेनरला रविवारी हिरवी झेंडी दाखविली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री यांनी वडेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या आधुनिक फळे व भाजीपाला सुविधा केंद्राची पाहणी केली. यावेळी आमदार राजू कारेमोरे, आशिष जयस्वाल, माजी खासदार मधुकर कुकडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव गणेश जगताप, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रमोद तितीरमारे, महिला काँग्रेसच्या सीमा भुरे, शहराध्यक्ष सचिन घनमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, संचालक अरविंद कारेमोरे, गुलराज कुंदवाणी व पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, आमदार कारेमोरे आणि कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील अनेक प्रश्न मांडले. हे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार पावले उचलीत आहे.
यावेळी बाजार समिती आणि जिल्हा स्वस्त दुकानदार संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांच्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
वडेगाव येथे पंधरा दिवसापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर कडून सुविधा केंद्र हस्तांतरित केल्यानंतर निर्यात उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती मित्राय फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन प्रफुल्ल बांडेबुचे यांनी दिली. या केंद्राद्वारे ४५ टन भेंडी यापूर्वी हवाईमार्गाने निर्यात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ३ फेब्रुवारी नंतर दोन कंटेनर पाठवण्याची योजना आहे. निर्यात उपक्रमामुळे सुविधा केंद्राने रोजगार निर्मिती केली आहे, असेही ते म्हणाले. संचालन प्रफुल बांडेबुचे यांनी केले.