आधारभूत धान खरेदी उघड्यावर करण्याची पाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:34 AM2021-03-21T04:34:34+5:302021-03-21T04:34:34+5:30
गोडाऊनची उपलब्धता व बारदाना पुरवठा यामुळे आधारभूत धान खरेदी वारंवार बंद ठेवण्याची पाळी यावर्षी धान खरेदी करणाऱ्या एजन्सीवर ...
गोडाऊनची उपलब्धता व बारदाना पुरवठा यामुळे आधारभूत धान खरेदी वारंवार बंद ठेवण्याची पाळी यावर्षी धान खरेदी करणाऱ्या एजन्सीवर आली. त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. अद्यापही धान खरेदी पूर्ण झालेली नाही. शासनाकडून चुकारे देण्यात आलेले नाही. धान पिकासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड मार्च महिन्यात करावी, यासाठी राष्ट्रीय व सहकारी बॅंकांचा तगादा असतो. काही शेतकऱ्यांची धान विक्री व्हायची आहे, ज्यांचे खरेदी करण्यात आले त्यांना चुकारे मिळालेले नाही. अशा बिकट परिस्थितीत धान उत्पादकांनी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड मार्च अखेर कशी करावी ही समस्या उभी ठाकली आहे. जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांनी धान खरेदी व शेतकऱ्यांचे चुकारे याकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.