नातेवाइकांना साेडायला जाणे झाले स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:36 AM2021-09-19T04:36:43+5:302021-09-19T04:36:43+5:30

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने प्लॅटफाॅर्म तिकीट दर दहा रुपयांवरून ५० रुपये केले ...

It was cheaper to visit relatives | नातेवाइकांना साेडायला जाणे झाले स्वस्त

नातेवाइकांना साेडायला जाणे झाले स्वस्त

googlenewsNext

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने प्लॅटफाॅर्म तिकीट दर दहा रुपयांवरून ५० रुपये केले होते. त्यामुळे रेल्वेस्थानकावर नातेवाईक व मित्रपरिवाराला सोडणे चांगलेच महागडे झाले होते.

मागील सहा महिन्यांपासून प्लॅटफाॅर्म तिकीट दर ५० रुपये होते. प्लॅटफाॅर्म तिकीट दर पूर्ववत करण्याची मागणी वाढल्यानंतर रेल्वेने ते दर पूर्ववत १० रुपये केले आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला.

वर्षभर हाेता ३० रुपयांचा भुर्दंड

कोरोना संसर्गामुळे रेल्वेस्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफाॅर्म तिकिटाच्या दरात वाढ केली होती. जवळपास आठ महिने प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर कायम होते. त्यामुळे यातून रेल्वे विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला, तर प्रवाशांना भुर्दंड सहन सहन करावा लागला.

सुरू असलेल्या रेल्वे

- हावडा-अहमदाबाद

- हावडा-मुंबई मेल

- गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस

- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस

- छत्तीसगड-अमृतसर एक्स्प्रेस

- समता एक्स्प्रेस

राेज १०० प्लॅटफार्म तिकिटाची विक्री

गोंदिया रेल्वेस्थानकावरून दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या ७ ते ८ हजार आहे. या रेल्वेस्थानकावरून दररोज १००हून अधिक प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री केली जाते. प्लॅटफाॅर्म तिकीट दरात रेल्वे विभागाने वाढ केल्याने प्लॅटफाॅर्म तिकीट विक्री ४० ते ५०वर आली होती. जेवढा दर प्लॅटफाॅर्म तिकिटाचा आहे तेवढ्याच पैशात नातेवाइकाला तुमसरपर्यंत रेल्वेने सोडून येणे शक्य होते.

Web Title: It was cheaper to visit relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.