रबी धान खरेदीचा मार्ग होणार सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:37 AM2021-05-09T04:37:00+5:302021-05-09T04:37:00+5:30
याची दखल घेत सचिव विलास पाटील यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भेट देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी ...
याची दखल घेत सचिव विलास पाटील यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भेट देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. राईस मिलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी राईस मिलर्सनी सकारात्मकता दर्शविल्याने धान भरडाईचा प्रश्न मोकळा होणार आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील यंत्रणेला पर्यायी खासगी गोदामाची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना केली. या बैठकीत आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजू जैन यांनी रबी हंगामातील धान खरेदी तात्काळ सुरू करण्याची मागणी केली.
धान खरेदी व भरडाईच्या प्रश्नावर खासदार प्रफुल पटेल हे शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करीत आहे.
बॉक्स
खासगी गोदाम भाड्याने घ्या
खरीप हंगामात खरेदी केलेला लाखो क्विंटल धान गोदामात पडून आहे. त्यामुळे रबी धान खरेदी करण्याची अडचण जात आहे. या धानाची साठवणूक करण्यासाठी खासगी गोदाम भाड्याने घेऊन उचल करावी, अशी मागणी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव पाटील यांच्याकडे केली.