आयटीआय प्रवेश प्रक्रिया कर्मचाऱ्यांना भोवणार
By admin | Published: September 11, 2015 01:00 AM2015-09-11T01:00:25+5:302015-09-11T01:00:25+5:30
आयटीआय आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला मात देत येथील कर्मचाऱ्यांना आर्थिक देवाण घेवाण करून तब्बल २१ विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश प्रक्रिया पार पाडल्याचे उघडकीस ....
समितीकडून चौकशी पूर्ण : २१ विद्यार्थ्यांना दिला होता बनावट प्रवेश
लाखांदूर : आयटीआय आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला मात देत येथील कर्मचाऱ्यांना आर्थिक देवाण घेवाण करून तब्बल २१ विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश प्रक्रिया पार पाडल्याचे उघडकीस आल्यानंतर सहसंचालक तंत्र व व्यवसाय मार्गदर्शन विभाग येथील समितीने तीन दिवसापूर्वी केलेल्या चौकशीत आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आठ ट्रेड अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवसाय व मार्गदर्शन प्रशिक्षण दिल्या जाते. यासाठी प्रवेश प्रक्रिया संगणीकृत केल्याने घेणारा प्रवेश प्रक्रियेतील घोळ थांबविण्यासाठी शासनाचा प्रयत्न त्याच विभागातील कर्मचाऱ्यांनी कसा हाणून पाडला हे चौकशीतून उघड झाले.
आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे मुळ कागदपत्र त्या प्रशिक्षण संस्थेत तपासण्याकरिता ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आर्थिक देवाण घेवाण करून तब्बल २१ विद्यार्थ्यांचे बोगस सदर संस्थेत प्रवेश दिल्याचे उघड झाले.
दि. ३ सप्टेंबरला उच्चस्तरीय समितीने दिवसभर संस्थेत मुळ कागदपत्रांची तपासणी केली. मात्र यातील गुप्तता राखण्यात आली. परंतु मिळालेल्या माहितीनुसार २१ विद्यार्थ्यांचे प्रवेश चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. या समितीच्या चौकशीचा अहवाल चौकशी प्रमुख कुकडे यांनी येत्या आठ दिवसात सदर संस्थेच्या प्राचार्याकडून उपलब्ध केला जाणार असल्याचे प्रतिनिधीला सांगितले.
संस्थेत ज्या २१ विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने कर्मचाऱ्यांशी संगनमत करून प्रवेश मिळविला होता. त्यातील बहुतांश विद्यार्थी चौकशी सुरु असताना संस्थेत गैरहजर आढळून आले. यातील दोषीवर कारवाईची मागणीही अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)