तात्पुरते नव्हे, हे तर जीवघेणे भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:14 PM2017-09-13T23:14:12+5:302017-09-13T23:14:52+5:30

जिल्ह्यात होत असलेल्या अवाजवी भारनियमनाविरूद्ध नागरिकांनी आवाज बुलंद केला आहे.

It's not just temporary, but it's a life-threatening weight regulation | तात्पुरते नव्हे, हे तर जीवघेणे भारनियमन

तात्पुरते नव्हे, हे तर जीवघेणे भारनियमन

Next
ठळक मुद्देविविध संघटना एकवटल्या : धारगाव येथे घेराव, अनेक ठिकाणी १६ तासांचे भारनियमन, अर्धे तुमसर शहर जाम फिडरवर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात होत असलेल्या अवाजवी भारनियमनाविरूद्ध नागरिकांनी आवाज बुलंद केला आहे. तात्पुरते नव्हे, हे तर जीवघेणे भारनियमन असल्याचे नागरिक बोलून दाखवित आहेत. १६ तासांचे भारनियमन होत असल्यामुळे लघु उद्योगाला याचा फटका बसत आहे.
धारगाव येथे अभियत्यांना घेराव
आमगाव (दिघोरी) : १३ तासांच्या चा विद्युत भारनियमनाने ग्रामीण जनता होरपळून गेली असून धारगाव वीज वितरणाचे उपकेंद्रावर शेकडो ग्रामस्थांना मोर्चा नेऊन भारनियमन बंद करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाºयांना घेराव केला व भारनियमनाचे वेळापत्रक बदलविण्याचे निवेदन दिले. परिसरामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने धानपिके वाचविण्यासाठी शेतकºयाला मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने व १३ तास विद्युत पुरवठा बंद केल्या जात असल्याने शेतीला पाणी कसे द्यावे हा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. तसेच भारनियमनामुळे लघु उद्योगावर विपरित परिणाम पडला आहे.
पावसाळ्याच्या दिवसामध्ये सरपटणाºया प्राण्यांची भीती मोठ्या प्रमाणात असते. रात्रीला गावामध्ये सर्वत्र काळोख पसरले असते. त्यामुळे घराबाहेर निघायला भीती असते. तसेच शाळकरी मुलांना अभ्यास करायला त्रास सहन करावा लागतो.
भारनियमनरहित २४ तास वीज देण्याचे आश्वासन युती सरकारने दिले होते. त्यामुळे भारनियमन नागरिक विसरले होते. मागील चार दिवसापासून अचानक भारनियमन होत आहे. त्यात उकाड्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा स्थितीमध्ये घरात वीज असल्याने पंखा आणि कुलरही नाही तर बाहेरही हवा नाही. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या भारनियमनामुळे गावकºयांना पुन्हा राज्यातील आघाडी शासनाची आठवण झाली आहे. मात्र या भारनियमनावर शासन उपाय करणार काय? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. त्यामुळे धारगाव येथे विद्युत कार्यालयावर माजी पं.स. सदस्य गुड्डू सार्वे, शेखर साखरे, हेमराज गिºहेपुंजे, संघदीप नंदेश्वर यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी मोर्चा नेला व अधिकाºयांना घेराव केला. यावेळी विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता फटे, ग्रामीण विभागाचे अभियंता प्रदीप भोयर व कनिष्ठ अभियंता एम.के. सिंग यांनी गावकºयांची समजूत काढली. उपविभागीय अभियंता (ग्रामीण) प्रदीप भोयर यांनी, भारनियमनाची ही समस्या तात्पुरती असून एक दोन दिवसामध्ये स्थिती पूर्वपदावर येणार असल्याचे सांगितले.
महिलांचा कँडल मोर्चा
तुमसर : महावितरण विभागाने तुमसर शहराची विभागणी करून खापा टोली परिसराला ग्रामीण फिडरशी जोडल्याने तुमसरकरांना आठ तास भारनियमनाचे असह्य चटक्यामुळे महिला व छोटे बालके प्रभावित झाले आहेत. परिणामी तुमसरच्या रणरागिनी स्वयंप्रेरणेने प्रेरीत होऊन रस्त्यावर उतरून १५ रोजी महावितरणच्या कार्यालयावर कँडल मोर्चा काढणार आहेत. तुमसर तालुक्यात स्वाईन फ्ल्यू सारख्या अन्य संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. १५ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता बसस्थानकवरून महावितरणच्या कार्यालयावर कँडलमार्च काढून खापा परिसरातील वीज तुमसर टाऊन फिडरवर करावी अन्यथा लोडशेडींग पूर्णत: बंद करण्याची मागणी करणार आहेत.
कँडल मोर्चा हा लक्ष वेधून घेणारा असल्यामुळे खापा परिसरातील महिलांनी संख्येनी उपस्थित राहावे, असे आवाहन उडाण संस्थेचे कल्याणी भुरे यांनी केले आहे.
तुमसर : अर्ध्या शहराला ग्रामीण फिडरवरून वीज पुरवठा सुरु असल्याने भारनियमन मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बुधवारी श्रीराम नगरवासीयांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. १५ सप्टेंबरपर्यंत भारनियमन बंद न केल्यास १६ सप्टेंबरला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे.
उपकार्यकारी अभियंता रुपेश अवचट यांना निवेदन देऊन समस्येविषयी चर्चा केली. शहरातील श्रीरामनगर हे जाम फिडरवर जोडले आहे. शिष्टमंडळात योगेश सिंगनजुडे, नगरसेवक बाळा ठाकुर, सचिन गायधने, निरज गौर, जि.प. माजी सदस्य सुरेश रहागडे, कमलाकर निखाडे, शिव बोरकर, आशिष कुकडे, राकेश धार्मिक, हरिश दादलानी, विकास मते, अवी बडवाईक, शुभम तिडके, केशव मते, नरेश इळपाते, प्रशांत वासनिक, भूपेश वासनिक, प्रफुल्ल आस्वले, सुमीत मलेवार, कृषभ बाणासुरे, नरेंद्र कहालकर, अमरनाथ बडवाईक, अनिकेत बडवाईक उपस्थित होते. शिवसेनेचे वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना शिवसेना जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले, पंचायत समिती उपसभापती शेखर कोतपल्लीवार, सुधाकर कारेमोरे, नरेश उचिबघले, नितीन सेलोकर, अमीत मेश्राम, मनोज चौबे, मनोहर जांगळे आदी उपस्थित होते.

Web Title: It's not just temporary, but it's a life-threatening weight regulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.