आली रे आली, आता नवतलावाची पाळी आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:09+5:302021-05-28T04:26:09+5:30

भंडारा : एकेकाळी तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या जिल्ह्यात तलावांची अधोगती होतेय. एकट्या भंडारा शहरात डझनभर तलाव अस्तित्वात होते; ...

It's raining, it's time for a new lake | आली रे आली, आता नवतलावाची पाळी आली

आली रे आली, आता नवतलावाची पाळी आली

Next

भंडारा : एकेकाळी तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या जिल्ह्यात तलावांची अधोगती होतेय. एकट्या भंडारा शहरात डझनभर तलाव अस्तित्वात होते; मात्र त्यापैकी फक्त चार ते पाच तलाव शिल्लक आहेत. त्यातही मिस्किन टॅंक तलावाला अतिक्रमणधारकांनी वेढा घातला आहे; तर आता शास्त्रीनगर परिसराला लागून असलेल्या नवतलावालाही ‘दृष्ट’ नजर लागली आहे. हे तलाव पूर्णतः गिळंकृत करण्याचा सपाटा काहींनी लावल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे शहरातील अन्य तलवांप्रमाणे आली रे आली, आता नवतलावाची पाळी आली, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

भंडारा शहरात सागर तलाव, नवतलाव, जोगी तलाव, खांबतलाव, मिस्किन टॅंक तलाव यासह अन्य सखल भागात लहान तलाव व डबके अस्तित्वात होते. कालानुरूप वस्ती वाढत गेल्याने या तलावांची जागा मोठमोठ्या वस्त्या व इमारतींनी घेतली. त्याला बुजवून वस्ती व आलिशान कॉम्प्लेक्स उभारण्याचे काम जोरात सुरू झाले. पाहता-पाहता भंडारा शहरातील डझनभर तलावांची संख्या चार ते पाचवर आली आहे. आता तर चक्क तलाव बुजवून त्यावर प्लॉटस् उभारण्याचा मनसुबा काहीजणांचा असल्याचे दिसून येते. सर्वप्रथम तलाव रिकामा करून त्यावर सूर्यफूल उगवण्याचे धाडस करण्यात आले. यानंतर तो तलाव नसून, शेतजमिनीची जागा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता तर हा तलाव पूर्णतः अतिक्रमित करून त्यावर प्लॉटस् आखण्याचे काम हाती घेण्यात येत असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. मात्र नागरिकांच्या नजरेआड हा सगळा गोरखधंदा सुरू आहे. काही जागरूक नागरिकांनी यावर आवाज बुलंद केला असता, त्यांनाही दाबण्याचे प्रयत्न करण्यात आले. कधी दमदाटी, तर कधी बळाचा वापरही करण्यात येत असतो. मात्र जमीन तस्करांनी आता तलावांना पुन्हा एकदा टारगेट केले आहे, हीच खरी या शहराची शोकांतिका म्हणावी लागेल.

बॉक्स

जिल्हाधिकारी लक्ष घालणार काय?

शास्त्रीनगर परिसराला लागून असलेल्या नवतलाव हा २७ एकर जागेत आहे. नियमाप्रमाणे तलावातील पाणी काढता येत नाही. अतिक्रमण करणे ही बाब तर कायद्याने गुन्हा आहे. मात्र पाणी क्षेत्र रिकामे करून त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. माती टाकून हळूहळू नवतलावाचे क्षेत्र कमी करण्यात आले. आता याप्रकरणी जिल्हाधिकारी याकडे लक्ष घालतील, तर या तलावाला नवसंजीवनी मिळू शकेल. अन्यथा हा तलावसुद्धा काळानुरूप नाहीसा होईल, यात शंका नाही

Web Title: It's raining, it's time for a new lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.