आला पावसाळा आता आपले आरोग्य सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:27 AM2021-07-17T04:27:31+5:302021-07-17T04:27:31+5:30
बॉक्स रस्त्यावरील अन्न खाणे शक्यतो टाळा अनेकदा रस्त्यावरील वडापाव, समोसे, तळलेले पदार्थ, मिठाई, चीज, पनीरसोबतच मांसाहारी पदार्थ खाणे शक्यतो ...
बॉक्स
रस्त्यावरील अन्न खाणे शक्यतो टाळा
अनेकदा रस्त्यावरील वडापाव, समोसे, तळलेले पदार्थ, मिठाई, चीज, पनीरसोबतच मांसाहारी पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. हे पावसाळ्यात टाळण्यासाठीच आपल्या पूर्वजांनी चातुर्मासाची संकल्पना पुढे आणली. श्रावण महिन्यात मांसाहार न करण्याची पद्धत यातूनच रूढ झाली आहे. याचा बारकाईने विचार केल्यास जड अन्न न खाता पचनास हलके तसेच उपवासाच्या निमित्ताने कमी करण्याचा संदेश दिला आहे.
बॉक्स
पावसाळ्याच्या दिवसात हे खाणे टाळावे...पावसाळ्यात विशेषत; रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ तसेच मीठ जास्त असलेले पदार्थ सॉफ्टड्रिंक, थंड पेय, चायनीज सारखे पदार्थ खाणे हे शरीरासाठी केव्हाही घातकच ठरते. यातूनच आपण आजाराला आमंत्रण देत असतो. यासोबतच पावसाळ्यात तेलकट पदार्थ खाण्यावर नियंत्रण हवे. पावसाळ्यात आपला जठराग्नी मंद होतो. म्हणूनच या काळात कमी आहार करणे गरजेचे असते. पचन संदर्भातील आजार टाळण्यासाठी काळजी घेतली पाहिजे.
बॉक्स
पावसाळ्याच्या दिवसात हे खावे...
पावसाच्या दिवसात आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, यासाठी संध्याकाळी लवकर जेवावे. त्यामुळे पचन सुलभ होते. विशेषत: आहारामध्ये जांभळे, मक्याचे भुट्टे, रानभाज्या, घरचे जेवणात वरण-भात-भाजी-पोळी, ताजे अन्न नक्कीच सुरक्षित. सोबतच पोळी, भाकरी, थालीपीठ, पराठे जास्त खावेत. नाचणी, शिंगाडा, हातसडीचा तांदूळ याचाही आहारामध्ये समावेश करता येईल.
कोट
प्रतिकारशक्ती व पचनसंस्थेची ताकद वाढविणारे अन्नपदार्थ पावसाळ्यात नेहमीच उपयुक्त ठरतात. पावसाळ्यात आल्याचा चहा किंवा दुधात हळद घालून घेणे हे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. या काळात आहार कमीच घ्यायला हवा.
डॉ.दिलीप गिऱ्हेपुंजे,
तज्ज्ञ
कोट
भंडारा जिल्हा हा नैसर्गिक विपुलतेने समृद्ध आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात शेतशिवारात अनेक रानभाज्या सहज उपलब्ध होतात. यातून शरीराला आवश्यक घटक मिळत असल्याने नागरिकांनी आवर्जून रानभाज्या खाणे गरजेचे आहे. यातून शेतकऱ्यांना रोजगारही मिळू शकतो.
मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.