भंडारा येथे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 09:44 PM2019-03-05T21:44:00+5:302019-03-05T21:44:20+5:30

संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रव्यापी बंद निमित्ताने भंडारा येथे मंगळवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. येथील त्रिमूर्ती चौकात अनेकांनी अटक करवून घेतली.

Jail Bharo movement at Bhandara | भंडारा येथे जेलभरो आंदोलन

भंडारा येथे जेलभरो आंदोलन

Next
ठळक मुद्देप्रशासनाला निवेदन : अनेकांनी घेतली अटक करवून

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रव्यापी बंद निमित्ताने भंडारा येथे मंगळवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. येथील त्रिमूर्ती चौकात अनेकांनी अटक करवून घेतली.
संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने नऊ मुद्यांवर संपूर्ण देशभर आंदोलन केले. त्यानिमित्त भंडारा येथेही आंदोलन करण्यात आले. सकाळी भंडारा शहरातून रॅली काढण्यात आली. तर सायंकाळी ५ वाजता येथील त्रिमूर्ती चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी अचल मेश्राम, सुनील चवळे, हर्षिला गराडे, सुषमा शहारे, वैशाली डोंगरे, विजयकांत बडगे, किशोर मेश्राम, धर्मेंद्र मेश्राम, रामकृष्ण नगरे, बळीराम सार्वे, रामदास मेश्राम, चिंतामण वाघमारे, निखील राऊत, रुपचंद डोंगरे, धर्मदास गणवीर, कृपालम बागडे, भोजराज जनबंधू, नाशिक रामटेके, राजेश बन्सोड, गणेश धांडे, ओमराज बांते, कार्तीक वडस्कर आदींनी अटक करवून घेतली. यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

Web Title: Jail Bharo movement at Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.