पावसाकरिता जलाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:03 PM2017-08-25T23:03:42+5:302017-08-25T23:04:05+5:30
पुर्व विदर्भात अपेक्षेनुरुप पाऊस बरसला नाही. जिल्ह्यातील शेतकºयांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : पुर्व विदर्भात अपेक्षेनुरुप पाऊस बरसला नाही. जिल्ह्यातील शेतकºयांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मुसळधार पाऊस बरसला पाहिजे याकरिता आमदार चरण वाघमारे यांनी तुमसरातील प्राचीन शिवमंदिरात जलाभिषेक करुन पूजन केले. याप्रसंगी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
जून महिन्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाने सातत्याने कान्हाडोळा केला. बावनथडी प्रकल्पासोबत सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून शेतीला पाणी देण्यात आले. मात्र त्यानंतर पाऊस बरसला नाही.
नैसर्गिकरित्या धानाला पाण्याची नितांत गरज असते. जलस्त्रोत कोरडे पडल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध कसे करुन द्यायचे हा प्रश्नही पावसाअभावी निरुत्तर आहे.
भविष्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तलाव, विहिरी व नाल्यांमध्ये पाण्याचा साठा अल्प आहे. पावसाने दमदारपणे पुनर्रागमन करावे आमदार चरण वाघमारे यांनी शहरातील प्राचीन शिवमंदिरात जावून महाअभिषेक केला. यावेळी नगराध्यक्ष प्रदीप प्रडोळे, जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले, नगरसेवक मेहताबसिंग ठाकूर, शहर भाजपअध्यक्ष विजय जयस्वाल, माजी नगराध्यक्ष गिता कोंडेवार, राजा लांजेवार, पंचायत समिती सदस्य मुन्ना पुंडे, पंकज बालपांडे, कैलास पडोळे, विक्रम लांजेवार, विजय लांजेवार, अनिल जिभकाटे, सिताराम शर्मा, ललीत मिश्रा, तरुण साधवानी, लक्ष्मीकात सलामे यांच्यासह भाजपाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.