जलयुक्त शिवार अभियान लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:29 PM2017-08-28T23:29:17+5:302017-08-28T23:29:35+5:30

राज्यात सतत टंचाईसदृष्य स्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे.

Jalate Shivar campaign should be a folk force | जलयुक्त शिवार अभियान लोकचळवळ व्हावी

जलयुक्त शिवार अभियान लोकचळवळ व्हावी

googlenewsNext
ठळक मुद्देतरकसे यांचे प्रतिपादन : सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, शेतकरी यांचे प्रशिक्षण वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : राज्यात सतत टंचाईसदृष्य स्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. राज्यात मागील ४ दशकात कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर चढउतार दिसून येत आहे. या परिस्थितीस मुख्यत्वेकरून पाण्याची कमी उपलब्धता हा घटक कारणीभूत आहे. शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी जलसंधारणाअंतर्गत उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करून राबविल्यास पिण्याचे पाणी व विकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्चितपणे करता येईल. यासाठी जलयुक्तशिवार अभियानाच्या माध्यमातून लोकचवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे यांनी केले.
मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य, जिल्हा पाणलोट विकास कक्ष तथा जिल्हा माहिती केंद्र जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय भंडारा व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ अंतर्गत भंडारा तालुक्यातील १० गावातील गावपातळीवरील शासकीय व अशासकीय प्रतिनिधीकरिता आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमातील उद्घाटकीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा येथील प्रशिक्षण सभागृहात २३ ते २५ आॅगस्ट या कालावधीकरिता गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक, महिला प्रतिनिधी व प्रगतिशील शेतकरी यांचेकरिता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाव पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे, तालुका कृषी अधिकारी एस. जी. गणवीर, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक एन. व्ही. गणविर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर, सेवानवृत्त प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे आर.एस. मांढरे उपस्थित होते.
यावेळी अविल बोरकर, आर. एस. मांढरे, एस. एस. पिल्लेवान, डॉ. रेखा बोधनकर, मिलींद गजभिये, एस. जी. गणवीर, बी.व्ही. वैद्य, जितेंद्र वंजारी, अरविंद धारगावे आदींनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात १० गावातील कृषी सहाय्यक ११, ग्रामसेवक १०, सरपंच १०, महिला प्रतिनिधी ४, शेतकरी ११, उपसरपंच २ असे एकूण ४८ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमासाठी सागर बागडे, विवेक नंदनवार, वैषाली गणवीर, जागेश्वर पाल, शेतकरी आदींनी ंसहकार्य केले.

Web Title: Jalate Shivar campaign should be a folk force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.