जिल्ह्यात स्प्रिंग डेलची जान्हवी पवार अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 05:00 AM2020-07-16T05:00:00+5:302020-07-16T05:00:38+5:30
भंडारा येथील स्प्रिंग डेल शाळेची जान्हवी पवार ही जिल्ह्यातून प्रथम आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर अंशूजा हजारे असून तिला ९८ टक्के गुण असून ती जिल्ह्यातही दुसरी आहे. तिसऱ्या क्रमांकावर बेला येथील सेंट पिटर्स शाळेची विद्यार्थिनी अंजली मानकर आली असून तिला ९७.८ टक्के गुण मिळाले आहेत. चौथा क्रमांक याच शाळेचा विद्यार्थी अर्पित भैसारे आला असून त्याला ९७.४ टक्के गुण आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी दहावीच्या परीक्षेचा निकाल घोषित केला असून जिल्ह्यातील १६ शाळांमधून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. भंडारातील सनीज स्प्रिंग डेल शाळेची विद्यार्थिनी जान्हवी विजय पवार हिने जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. तिला ९८.२ टक्के गुण मिळाले आहेत. यंदाही मुलांपेक्षा मुलींनी निकालात बाजी मारली आहे.
भंडारा येथील स्प्रिंग डेल शाळेची जान्हवी पवार ही जिल्ह्यातून प्रथम आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर अंशूजा हजारे असून तिला ९८ टक्के गुण असून ती जिल्ह्यातही दुसरी आहे. तिसऱ्या क्रमांकावर बेला येथील सेंट पिटर्स शाळेची विद्यार्थिनी अंजली मानकर आली असून तिला ९७.८ टक्के गुण मिळाले आहेत. चौथा क्रमांक याच शाळेचा विद्यार्थी अर्पित भैसारे आला असून त्याला ९७.४ टक्के गुण आहेत. पाचव्या स्थानी संयुक्तपणे महर्षी विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी चैतन्या वंजारी व पवनी येथील मनोसुमन पब्लिक शाळेचा विद्यार्थी जय कुर्झेकर आले आहेत. दोघांनाही ९७.२ टक्के गुण आहेत.
भंडारा शहरातील सनीज स्प्रिंग डेल शाळेतून तिसऱ्या क्रमांकावर सृजनी झंझाड आली असून तिला ९६.६ टक्के गुण आहेत. एकुण निकालात दहा विद्यार्थ्यांना ९५ पेक्षा तर ३८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यापेक्षा गुण आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे सचिव सुनील मेंढे, शुभांगी मेंढे, मुख्याध्यापिका शेफाली पाल, समृद्धी गंगाखेडकर, कल्पना जांगडे, शीतल मुधोळकर आदींनी कौतूक केले आहे.
फुलमोगरा स्थित महर्षी विद्या मंदिर शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेतून २३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. जिल्ह्यातून पाचव्या स्थानी व शाळेतून प्रथम येण्याचा मान चैतन्या वंजारी हिने प्राप्त केला आहे. तिला ९७.२० टक्के गुण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर उज्ज्वला मेहर (९६.८), तर तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे आर्यन कांबळे, टिना कारेमोरे आले असून दोघांनाही ९६.६ टक्के गुण मिळाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य श्रूती ओहळे, शिक्षक भाग्यश्री ब्राम्हणकर, पद्मजा गंगणे, सतीश श्रीवास्तव, प्रज्ञा संगीतराव, प्रवीण टाकसाळे, अनिता शर्मा यांच्यासह अन्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतूक केले आहे. शाळेतून २५ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. १०० टक्के निकाल देणारी भंडारा शहरातील ही एकमेव शाळा आहे.
खात रोड स्थित सेंट मेरिस शाळेतून २९ विद्यार्थी बसले होते. यात शाळेतून प्रथम येण्याचा मान रिन्वयी अनमोल शामकुवर हिने प्राप्त केला. तिला ९६ टक्के गुण मिळाले. दुसऱ्या स्थानी तुषार प्रकाश हेमणे (९२.७) तर तृतीय क्रमांकावर समृद्धी इंगोले (९२), चौथ्या स्थानी आयुष संजय चवरे (९१.२) तर पाचव्या क्रमांकावर प्रांजली करमचंद वैरागडे (९१) आली आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा संचालक बेबी थॉमस, प्राचार्य नायर यासह अन्य शिक्षकांनी कौतूक केले आहे.
तुमसर येथील फ्रांसीस एंजेल शाळेची विद्यार्थिनी सेजल मदनकर हिला ९६.६ टक्के गुण मिळाले. दुसऱ्या स्थानी प्राजक्ता कुंभारे ९६.४ व तिसºया स्थानी अक्षदा पडोळे (९६) आली आहे. बेला येथील सेंट पिटर शाळेतून १४१ विद्यार्थी बसले होते. यात ३६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण घेतले आहेत. शाळेतून प्रथम अंजली मानकर (९७.८), द्वितीय अर्पित भैसारे (९७.४) व तिसऱ्या क्रमांकावर तृषांत बडवाईक (९७.२) आला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे फादर जयप्रकाश, सिस्टर कॅरोली, सिस्टर जोसीटा आदींनी कौतूक केले आहे. जवाहरनगर येथील केंद्रीय विद्यालयातून प्रथम पुर्णीमा साहू (९४.४), द्वितीय आयुष हटवार (९०.६) आला आहे. लाखनी तालुक्यातील स्कायवर्ड इंटरनॅशनल शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून सुमीत नेत्राम बोपचे याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याला ८९ टक्के गुण मिळाले. रॉयल पब्लिक शाळेतून प्रथम श्रेणीत २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम ऋतूजा हलमारे (९६.८), द्वितीयस्थानी संयुक्तपणे श्रृती कारेमोरे व पारस कावळे यांना (९६.६) टक्के गुण मिळाले.
पाच शाळा शंभर टक्के
सीबीएसई दहावीच्या निकालात भंडारा जिल्ह्यातून तीन शाळा शंभर टक्के निकाल देणाºया ठरल्या आहेत. यात भंडारा तालुक्यातील फुलमोगरा स्थित महर्षी विद्या मंदिर, जवाहरनगर येथील केंद्रीय विद्यालय, लाखनी तालुक्यातील पिंपळगाव स्थित स्कायवर्ड इंटरनॅशनल स्कूल व तुमसर येथील फ्रांसीस एंजेल आणि युएसए विद्या निकेतन शाळेचा समावेश आहे.