भंडारा जिल्ह्यातील जनता विद्यालयाची जान्हवी तुमसरे बनवणार लघु उपग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:25 PM2021-01-20T12:25:45+5:302021-01-20T12:26:15+5:30

Bhandara News डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ साठी विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करून पहिल्यांदाच जागतिक, आशिया आणि भारतीय विक्रमासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

Janhvi Tumsare of Janata Vidyalaya in Bhandara district will make a small satellite | भंडारा जिल्ह्यातील जनता विद्यालयाची जान्हवी तुमसरे बनवणार लघु उपग्रह

भंडारा जिल्ह्यातील जनता विद्यालयाची जान्हवी तुमसरे बनवणार लघु उपग्रह

Next
ठळक मुद्देएकाचवेळी करणार जागतिक, आशियाई व भारतीय विक्रमाची नोंद

मोहन भोयर

 लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ साठी विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करून पहिल्यांदाच जागतिक, आशिया आणि भारतीय विक्रमासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. याकरिता जनता विद्यालयाची विद्यार्थिनी जान्हवी अरविंद तुमसरे हिची निवड करण्यात आली आहे.

             १०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात नेण्याच्या या प्रकल्पात विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजीची जिज्ञासा निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीत हे विद्यार्थी नक्कीच आपले योगदान देतील. सदर विक्रमात नाव कोरण्यासाठी तुमसर येथील जनता विद्यालयाची इयत्ता ७ वीची जान्हवी अरविंद तुमसरे या विद्यार्थिनीची निवड झाली असून, दि. १९ जानेवारीला नागपूरच्या सेंट विन्सेन्ट पल्लोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक वर्गास जान्हवी उपस्थित राहणार आहे. पालकांना व शाळा प्रशासनास या उपक्रमाची संपूर्ण माहिती देऊन चर्चा करण्यासाठी दिनांक १६ जानेवारी रोजी जनता विद्यालयात सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.

सभेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे कोअर कमिटी मेंबर दामोधर डहाळे यांनी फाउंडेशनचे उद्दिष्ट, कार्य याविषयी तसेच स्पेस झोन इंडिया व मार्टीन ग्रुप याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक केळवदे, शिक्षक. पंकज बोरकर, गभने, हिंगे, डोंगरे , पटले , साठवणे उपस्थित होते.

Web Title: Janhvi Tumsare of Janata Vidyalaya in Bhandara district will make a small satellite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.