ऐतिहासिक पोळ्यात उसळला जनसागर

By admin | Published: September 15, 2015 12:36 AM2015-09-15T00:36:25+5:302015-09-15T00:36:25+5:30

परसोडी (जवाहरनगर) येथे १८४८ पासून परसोडी या ठिकाणी ऐतिहासिक पोळा भरतो.

Jansagar, in the historic landmark | ऐतिहासिक पोळ्यात उसळला जनसागर

ऐतिहासिक पोळ्यात उसळला जनसागर

Next

१५७ वर्षांची परंपरा : दीडशे बैलजोड्यांची हजेरी
जवाहरनगर : परसोडी (जवाहरनगर) येथे १८४८ पासून परसोडी या ठिकाणी ऐतिहासिक पोळा भरतो. या ही वर्षी विक्रमी बैलांच्या जोडींनी उच्चांक गाठला. उत्कृष्ट बैलजोडी सजावटीकरिता पुरस्कार देण्यात आले.
परसोडीवासीयांनी जपलेली १५७ भूषणावह वर्षाची परंपरा पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. पोळा पंचकमेटी, ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पोळ्याचे आयोजन करण्यात आले.
बालगोपालापासून तर वृद्धगृहस्थांची गर्दी होती. यावर्षी दीडशे बैल जोडींनी हजेरी लावली. बैलजोडीला पुरस्कार मिळेल या आशेपोटी बैलाची सजावट कायम टिकवून ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे आयोजनकर्त्यांनी आंब्याच्या पानांचे तोरणही बैलजोड्यांसाठी अपुरे पडले. मंचावर झडत्या सुरु झाल्या.
‘‘हे झडझळती पाण्यावर पडती
माझा नंद्याची हो पुळ आती
माझा नंदी टुनटुना
त्याच्या पाठीवर वायला चना
जगचाळा नंदी वाडा,
तो गेला हो धामनवाडा
धानमवाड्याची आतला माती
परसोडीच्या हो आखरी ताडला
परसोडीचा आखर वाकडा तिकडा
माझ्या याची हो जांभाळी
वाघाचा चवळा अस्सील गुरुचा चेला
मारसील दहाचा उळा सांगून दे रे बेलबत्तीच्या झाडा
एक नमन कवडा पारबती
हरबोला हर हर महादेव’’
झडती म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली. यात मंसाराम वंजारी, दादाराव वंजारी, खुशाल फंदे, भाऊराव राऊत तर तरुणांमध्ये राजकपूर राऊत व विवेक वैरागडे यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारोतराव हटवार हे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, माजी समाजकल्याण सभापती राजकपूर राऊत, रघुपती फंदे, दौलत वंजारी, देवचंद सेलोकर, बंडू हटवार, कुलदीप कावळे, पृथ्वीराज शेंडे, ओमप्रकाश गेडाम, कार्तीकराम हटवार, सुनिल सेलोकर, मोतीलाल येळणे, नरेंद्र लेंडे, ऋषी लेंडे, श्याम महाराज, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ओमदेव चकोले, सरपंच मंजुळा वंजारी, उपसरपंच भाऊराव वैरागडे, श्रावण डोरले उपस्थित होते. पाहुण्यांनी बैलजोडी सजावटीचे निरीक्षण केले. उत्कृष्ट सजावटीकरिता उपस्थितांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यात विलास वंजारी, क्रिष्णा बावनकुडे, प्रवीण बडवाईक, श्रावण हटवार, रामेश्वर डोरले, मधुकर हटवार, विनोद वंजारी, प्रवीण हटवार, पंकज कुरंजेकर, दिशेन कंडणे, आनंद हटवार, लवा गभणे, दिलीप दादुरवाडे यांचा समावेश होता. प्रास्ताविक व संचालन पोलीस पाटील दौलत वंजारी यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Jansagar, in the historic landmark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.