वृक्षतोडप्रकरणी जेसीबी केली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 11:16 PM2018-09-14T23:16:22+5:302018-09-14T23:16:52+5:30
रेल्वे रुळाजवळ रस्त्याचे कामादरम्यान जेसीबीने वृक्षतोड करणाऱ्या जेसीबीला नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई केली. शुक्रवारी मौका पंचनामा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला. पवनारखारी गाव शिवारातील कंपार्टमेंट क्र. ८ मध्ये वृक्षतोड करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रेल्वे रुळाजवळ रस्त्याचे कामादरम्यान जेसीबीने वृक्षतोड करणाऱ्या जेसीबीला नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई केली. शुक्रवारी मौका पंचनामा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला. पवनारखारी गाव शिवारातील कंपार्टमेंट क्र. ८ मध्ये वृक्षतोड करण्यात आली.
तुमसर -तिरोडी दरम्यान रेल्वे ट्रॅक असून पवनारखारी शिवारात रेल्वे रुळाला लागून रस्त्याचे काम केले जात आहे. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त आहे. रेल्वे रुळाच्या बाजूला जेसीबी नेतांनी जंगलातील झाडे तोडण्यात आली. ही माहिती नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांना मिळाली. तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी धनविजय इतर कर्मचाऱ्यांसोबत पोहोचले. जेसीबीवर जप्तीची कारवाई केली. शुक्रवारी वनपरिक्षेत्र अधिकारी धनविजय तथा सर्व्हेयर यांनी मौका चौकशी करुन पंचनामा केला. घटनास्थळाजवळ काही शेतकऱ्यांची शेती आहे.
सदर जागा नेमकी कुणाची आहे यांची चौकशीा सध्या सुरु आहे. अशी माहिती वनपरिक्षेत्रधिकारी धनविजय यांनी दिली. जेसीबीने वृक्षतोड केल्याप्रकरणाची चौकशी सुरु असून त्या अनुषंगाने जेसीबी ताब्यात घेण्यात आली. नियमानुसार जंगलव्याप्त परिसरात वाहन तथा इतर कामे करतांनी वनविभागाची परवानगी येण्याची गरज आहे. येथे रेल्वेची जमीन रेल्वे रुळाजवळ आहे, परंतु वृक्षतोड करता येत नाही. त्या आधारावर वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी कारवाई केली आहे.