शेतकऱ्याचा 'देशी' प्रयोग, धान पीकावर चक्क दारूची फवारणी अन् पऱ्हे झाले झिंगाट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 06:38 PM2023-02-04T18:38:41+5:302023-02-04T18:44:15+5:30

धान पिकाच्या नर्सरीवर चक्क देशी दारूची फवारणी

Jevnala Farmer's 'Desi' Jugad, Spray Liquor On Paddy Crop | शेतकऱ्याचा 'देशी' प्रयोग, धान पीकावर चक्क दारूची फवारणी अन् पऱ्हे झाले झिंगाट

शेतकऱ्याचा 'देशी' प्रयोग, धान पीकावर चक्क दारूची फवारणी अन् पऱ्हे झाले झिंगाट

googlenewsNext

चंदन मोटघरे

लाखनी (भंडारा) : दारूमुळे होणारे दुष्परिणाम हे आपल्याला सर्वत्रच बघायला मिळतात मात्र भंडारा जिल्ह्यातील या पठ्याने चक्क धान पिकाच्या नर्सरीवर देशी दारूची फवारणी करत परह्यांना रोगमुक्त केलं असल्याचे समोर आले आहे. लाखनी तालुक्यातील जेवनाळा. येथील एका शेतकऱ्यानं दारूचा विधायक वापर केलाय. भातपिकावर फवारणीसाठी चक्क दारूचा वापर केलाय. फवारणीसाठी दारूचा वापर केल्यानं या फवारणीचा पिकाला फायदा झाला असल्याचे शेतकऱ्याचं म्हणणं आहे.

परिसरात सध्या उन्हाळी धान रोवणी साठी असलेल्या नर्सरी ची देखभाल सुरू आहे.वातावरणातील धुके पडण्याचे प्रमाण वाढल्याने धानाचे पऱ्हे हे पिवळे पडून कीडग्रस्त होत असल्याचे दिसून येत आहे मात्र रामदास गोंदोळे या युवा शेतकऱ्याने शेतात फवारणी चक्क देसी दारूची फवारणी करत ते रोग मुक्त केले आहे. आता तुम्ही म्हणाल, फवारणीत काय वेगळं? पणं फवारणीत वेगळं काही नाही, फवारणीसाठी म्हणून वापरलं जाणारं किटकनाशक आगळं वेगळं आहे. हे किटकनाशक आहे देशी दारू, देशी दारूचा भातपिकावर फवारणीसाठी वापर केल्याचे सांगत आहेत उमेश गोंदोळे यांनी एक पंप फवारणी साठी देशी दारूची नव्वद मिलीची बाटली व सोबत एक पाव युरिया यांची फवारणी केल्याने धानाची रोपे ही टवटवीत झाली आहेत. त्यामुळे पिकाची चांगली वाढ होऊन ते लवकरच रोवणी योग्य झाले आहेत. कृषीविभागासाठी हा प्रयोग नवा नाही. पण कोणत्याही कृषी विद्यापीठानं पिकांवरील मद्यप्रयोगाला अधिकृत परवानगी दिलेली नाही. पण या मद्यप्रयोग परिणामकारक असल्याचं कृषीशास्त्रज्ञ सांगतात.

यू ट्यूबवरून घेतली माहिती

उन्हाळी धान पिकाची नर्सरी ही दरवर्षी गरव्यामुळे कोमेजून जात होते अनेक महागड्या औषधी फवारणी करून त्यांचा परिणाम पाहिजे तसा मिळत नव्हते या साठी रामदास गोंडोळे यांनी आपल्या मोबाईल मधील युट्यूबचा उपयोग करून देसी दारू फवारणी केल्याने पीक जोमात येत आल्याची माहिती घेतली व देसी दारू खरेदी करून फवारणी केली आणि मिळालेले परिणाम हे अचंबित करणारे होते फवारणी केल्यानंतर चार ते पाच सहा दिवसात धान पीक हिरवेगार झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता हा देसी जुगाड अनेक शेतकरी वापरताना दिसत आहेत.

धानाची नर्सरी ही थंडी वाढल्यामुळे पिवळी पडून तिची वाढ थांबली होती. या साठी इतर फवारन्या केल्या मात्र सुधारणा झाली नाही. पण देसी दारू व युरिया खताची फवारणी करायच्या काही दिवसात नर्सरी हिरवीगार होऊन ते रोवणीयोग्य झाले आहेत.

- रामदास गोंदोळे शेतकरी, जेवणाळा

Web Title: Jevnala Farmer's 'Desi' Jugad, Spray Liquor On Paddy Crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.