संघटित होऊन बहुजन क्रांती मोर्च्यात सहभागी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:04 AM2018-04-27T01:04:47+5:302018-04-27T01:04:47+5:30
भारतामध्ये इंग्रजाची 'पॉलिसी' होती. बाटो और राज करो, त्यामुळे मुलनिवासी यांना सहा हजार जातीत विभाजन करुन सत्ता भोगली. त्यानंतर ज्या राजकीय पक्षांनी हातात सत्ता घेतली त्यांनी विविध जातीत फुट पाडून आणि राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : भारतामध्ये इंग्रजाची 'पॉलिसी' होती. बाटो और राज करो, त्यामुळे मुलनिवासी यांना सहा हजार जातीत विभाजन करुन सत्ता भोगली. त्यानंतर ज्या राजकीय पक्षांनी हातात सत्ता घेतली त्यांनी विविध जातीत फुट पाडून आणि राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला. देशात लोकशाही आणायची असेल व बहुजनांना न्याय पाहिजे असेल तर सर्व जाती समुहांनी एकत्र येऊन बहुजन क्रांती मोर्च्याच्या सहभागी व्हावे, असे आवाहन बहुजन क्रांती मोर्च्याचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केले.
होमगार्ड परेड ग्राऊंड येथे आयोजित परिवर्तन यात्राप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा संघटक ओबीसी महासंघाचे डॉ. अजयराव तुमसरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशनचे धर्मराज भलावी, भारतमुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण, राष्टÑीय मुस्लीम मोर्चा तालुकाध्यक्ष फिरोज खान, व्ही. जे. एन.टी. अधिकार बचाव संघर्ष समितीचे, कार्तिक वडसकर, बुध्दिस्ट फेडरेशनचे केदार नाकाडे आदी उपस्थित होते.
राष्टÑीय संयोजक वामन मेश्राम म्हणाले की, देशातील सहा हजार जातींना जागे करण्याची वेळ आलेली आहे. काँग्रेस नागनाथ तर बी.जे.पी. सापनाथ आहे. नागनाथने दंश केला तर माणुस ताबडतोब मरतो तर, सापानाथने दंश केला तर माणुस एक तासात मरतो, हे दोन्ही पक्ष हीच भूमिका बजावितात. हे दोन्ही पक्ष बहुजनांना न्याय मिळवून देऊ शकत नाही. त्यामुळे सर्व जातींना जोडण्याचा काम सुरु आहे. २० मार्च २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी अॅक्टच्या विरोधात आलेला निर्णय हा संविधानच्या सामाजिक न्यायाच्या विरोधात जाणारा आहे. सर्व बहुजनांवर अन्याय सुरुच आहे. त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे बहुजन विरोधी नितीच्या विरोधात बहुजन क्रांतीमोर्चा यात्रेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यामध्ये ३६७ तालुक्यात ही रॅली जाणार असून या रॅलीची सुरुवात २४ एप्रिलला दिक्षाभूमी नागपूर येथून झाली. त्याचा समारोप ३ जुनला पूणे येथे समारोपीय अभिवादन महारॅली घेणार आहे.
संचालन व प्रास्ताविक स्वप्नील वासनिक यांनी केले. त्आभार विवेकानंद राऊत यांनी मानले. कार्यक्रमासाठी स्वप्नील गजभिये, शुभम कुकडे, हरि येरणे, रुपेश खानोरकर व सर्व बहुजन क्रांती मोर्च्याची संयोजन समिती यांनी केले. भर उन्हात दुपारी २ वाजतापर्यंत सभा चालली. सभेला शेकडोंची गर्दी झाली होती. भोजनदानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली