रेंगेपार येथे रोहयो कामावर मजुरांची थट्टा

By admin | Published: June 4, 2017 12:18 AM2017-06-04T00:18:02+5:302017-06-04T00:18:02+5:30

तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सन २०१५ - १८ च्या नियोजनातील नवीन तलाव नहरातील गाळ काढण्याचे

Joke of laborers at RHHYO work at Rennepar | रेंगेपार येथे रोहयो कामावर मजुरांची थट्टा

रेंगेपार येथे रोहयो कामावर मजुरांची थट्टा

Next

नियमबाह्य काम : सोयी सुविधांचा अभाव, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सन २०१५ - १८ च्या नियोजनातील नवीन तलाव नहरातील गाळ काढण्याचे कामावर मजुरांची दिशाभूल करून नियमबाह्य काम केल्याचा आरोप खंडविकास अधिकारी ब्राम्हणकर यांना केलेल्या निवेदनात मजुरांनी केला आहे.
नवीन तलावाच्या नहराची लांबी ३ कि.मी. आहे. कामाची एकुण अंदाजित रक्कम २४ लक्ष ३१ हजार रुपये आहे. त्यात अकुशल काम १९ लक्ष २९ हजार रुपयांचे तर कुशल काम ५ लक्ष रुपयांचे आहे. एकुण मनुष्य दिवस १३ हजार ४३४ आहे. कामाची लांबी ३ कि.मी. आहे. परंतु अंदाजे ३५०० मिटर काम करण्याचे नियोजन आहे. सदर काम अंदाजे ६०० मिटर मौजा खेडेपार येथील सीमा क्षेत्रात आहे. रेंगेपार (कोठा) येथील सीमा पुरुषोत्तम पुडके यांच्या शेतापर्यंत आहे. रोहयो कामावरील मजुराची दिशाभूल करून मजुरांना मजुरी स्वरुपात ११० रु. ते १२० रुपये प्रमाणे दिली आहे.
मजुरांच्या सह्या व अंगठे कोऱ्या मस्टरवर घेतले जात असल्याचा आरोप केला आहे. शासकीय परिपत्रकाप्रमाणे व नियमानुसार २०१ रुपये मनुष्य दिवस प्रमाणे मजुरी ठरविलेली आहे. परिपत्रकानुसार मजुरांना मजुरी मिळत नसल्याचा आरोप मजुरांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परीषद मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात दिलेला आहे.
मग्रारोहयो अंतर्गत शासकीय परिपत्रकानुसार ज्या सोयी सुविधा उपलब्ध करावयाच्या आहेत त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही. तुटपुंजी मजूरी देवून मजुरांची थट्टा केली जात असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.

रेंगेपार (कोठा ) येथील रोहयो कामावरील मजुरांना सोयी सुविधा पुरविण्यात येत आहे. पंचायत समितीच्या तांत्रिक पॅनलच्या निकषानुसार काम सुरु आहे. मजुरांना कामाची मोजणी करून मजुरी देण्यात येत असते. ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या समन्वयातून काम सुरु आहे. त्यात कोणताही भेदाभेद केला जात नाही.
-नरेश शिवणकर, सचिव, ग्रामपंचायत रेंगेपार (कोठा)

Web Title: Joke of laborers at RHHYO work at Rennepar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.