जिल्हा मराठी पत्रकार भवनात पत्रकार दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:13 PM2018-11-16T22:13:12+5:302018-11-16T22:13:34+5:30

येथील भंडारा जिल्हा मराठी पत्रकार भवनात पत्रकार दिनाचा कार्यक्रम शुक्रवारला उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन प्रा.वामन तुरीले यांच्या हस्ते करण्यात आले.

Journalist's day in district journalist's house | जिल्हा मराठी पत्रकार भवनात पत्रकार दिन

जिल्हा मराठी पत्रकार भवनात पत्रकार दिन

googlenewsNext
ठळक मुद्देमान्यवरांचे मार्गदर्शन : पत्रकारांनी नवीन आवाहने स्वीकारण्यास सज्ज राहावे

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील भंडारा जिल्हा मराठी पत्रकार भवनात पत्रकार दिनाचा कार्यक्रम शुक्रवारला उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन प्रा.वामन तुरीले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते उपस्थित होते. पत्रकारीतेच्या समस्यांबाबत अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.रमेश सुपारे यांनी पत्रकारीतेची भुमिका, तसेच जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते यांनी शासनस्तरावर पत्रकारांसाठी काही योजना आखण्यात येत आहेत, याची माहिती दिली.
प्रा. वामन तुरीले यांनी पत्रकारांनी पत्रकारीतेवरच अवलंबून न राहता अन्य व्यवसायाकडे वळण्याची नितांत गरज आहे. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी म्हणून भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, सचिव मिलींद हळवे, ज्ञानेश्वर मुंदे, देवानंद नंदेश्वर, चंद्रकांत श्रीकोंडावर, प्रमोद भांडारकर, काशिनाथ ढोमणे हे होते तर सुरेश कोटगले, ललीत बाच्छील, अभिजित घोरमारे, शशिकुमार वर्मा, नरेश बोपचे, दिपक रोहणकर, निहाल भुरे, संजय मते, प्रा.विनोद मेश्राम ,माजी शिक्षणाधिकारी शेंडे, शामकुवर, हिवराज उके, राकेश चेटुले, देवानंद नंदेश्वर, पृथ्वीराज बन्सोड, नेहाल भुरे, विरेंद्र गजभिये व अन्य पत्रकारांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन मिलींद हळवे यांनी केले तर आभार काशिनाथ ढोमणे यांनी मानले.
जिल्हा माहिती कार्यालय भंडारा
भंडारा : जिल्हा माहिती कार्यालयात १६ नोव्हेंबरला राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने डिजीटल युगातील आचारनिती आणि आव्हान या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, पत्रकार दिपक फुलबांधे, काशिनाथ ढोमणे, विजय निचकवडे, अजय मेश्राम, सुरेश कोटगले, श्रीकांत पनकंटीवार, विजय क्षीरसागर, अभिजीत घोरमारे, राकेश श्यामकुवर, दिपेंद्र गोस्वामी, राजू मस्के, हिवराज उके, मनोहर मेश्राम, सुरेश फुलसुंगे, जिल्हा माहिती कार्यालयातील सुनिलदत्त जांभूळे, बंडू राठोड, सुनिल फुलसुंगे, घनश्याम सपाटे व रेखाबाई निनावे उपस्थित होते.

Web Title: Journalist's day in district journalist's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.