पत्रकारांनी भ्रष्टाचार निखंदून काढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 10:23 PM2018-01-07T22:23:29+5:302018-01-07T22:23:57+5:30
सध्याच्या काळात समाज माध्यमांचा उदय मोठ्या प्रमाणात झाला आहे. आवाज नसलेल्यांचा आवाज पोहचवण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची ठरली आहे.
आॅनलाईन लोकमत
तुमसर : सध्याच्या काळात समाज माध्यमांचा उदय मोठ्या प्रमाणात झाला आहे. आवाज नसलेल्यांचा आवाज पोहचवण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची ठरली आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने भ्रष्टाचार निखंदून काढावा, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी व्यक्त केले.
तुमसर पत्रकार असोसिएशनच्या वतीने मातोश्री लॉन येथे आयोजित मराठी पत्रकार दिन चर्चासत्राच्या कार्यक्रमात देश घडविण्याकरिता प्रसारमाध्यमांची प्रमुख भूमिका या विषयावर ते बोलत होते.
यावेळी आजतकचे क्राईम एडीटर दिपक शर्मा, न्यूज वर्ल्ड इंडियाचे संपादक मनोज भोयर तथा प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय अधिकारी विक्रम साळी, बीबीसी न्यूजचे पत्रकार संजय तिवारी उपस्थित होते.
यावेळी आजतकचे क्राईम एडिटर दीपक शर्मा यांनी, देशात चौथ्या स्तंभाचे काम करणारे पत्रकार लहान व मोठा होत नाही. त्यांची बातमी त्यांना मोठी करते. उत्तरप्रदेशातील लहान पत्रकाराच्या लेखणीने देशात खळबळ माजली. प्रसार माध्यमे कुणाच्या तरी मालकीची आहेत, त्यामुळे प्रत्येक पत्रकाराला सावध भूमिका घ्यावी लागते. मीडिया हा सुद्धा व्यवसाय आहे. व्यवसायाला फायद्याचा निर्णय मालकांना घ्यावाच लागतो. तरी स्टींग करणारे देशात अनेक पत्रकार आहेत. लोकशाहीच्या बळकटीकरिता सोशल मिडीयाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मनोज भोयर यांनी, पत्रकारांची भूमिका स्पष्ट व विश्वासू असावी. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा जनसामान्यांवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे पत्रकारांनी नि:ष्पक्ष भूमिका पार पाडावी. स्पर्धात्मक युगात मिडीयातही मोठी स्पर्धा आहे. यात इमानदार असेल तोच टिकेल असे सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी प्रभावी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन मोहन भोयर यांनी केले. प्रास्ताविक पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष गणेशराव बर्वे यांनी केले. तर आभार सचिन चैनलाल परिहार यांनी मानले. यावेळी माजी नगराध्यक्ष अरविंद कारेमोरे, अभिषेक कारेमोरे, विजयकुमार डेकाटे, सुधाकर कारेमोरे, डॉ.चेतनकुमार मसराम, डॉ.राहुल भगत, प्रा.संजय बुराडे, कल्याण भुरे, नशिने, अनिल जिभकाटे, पत्रकार संघाचे सुरेश बेलूरकर, शैलेश बन्सोड, देवाजी मेश्राम, महेश गायधने, अमित रंगारी, सहादेव बोरकर, मनोहर बिसने, ओमप्रकाश गायधने, रामलाल बिसने, सहादेव बोरकर आदी उपस्थित होते.