त्यांच्या दुर्दशेचा संपणार प्रवास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:50 PM2018-03-08T22:50:35+5:302018-03-08T22:50:35+5:30

कान्हळगाव- मोहाडीचा रस्ता पुन्हा गुळगुळीत होणार आहे. त्याची तीन दशकांपासूनची दुर्दशा लवकरच संपणार आहे. तो म्हणजेचकान्हळगाव -मोहाडी या चाळणी झालेल्या रस्त्याने देणाऱ्या यातनांचा प्रवास कधी संपणार याविषयी कान्हळगाव पश्चिमेकडील नागरिकांची प्रतिक्षा लागली होती.

The journey of their tragedy ... | त्यांच्या दुर्दशेचा संपणार प्रवास...

त्यांच्या दुर्दशेचा संपणार प्रवास...

Next
ठळक मुद्देवेदनेची दखल : चकचकीत होणार रस्ता

आॅनलाईन लोकमत
मोहाडी : कान्हळगाव- मोहाडीचा रस्ता पुन्हा गुळगुळीत होणार आहे. त्याची तीन दशकांपासूनची दुर्दशा लवकरच संपणार आहे. तो म्हणजेचकान्हळगाव -मोहाडी या चाळणी झालेल्या रस्त्याने देणाऱ्या यातनांचा प्रवास कधी संपणार याविषयी कान्हळगाव पश्चिमेकडील नागरिकांची प्रतिक्षा लागली होती. जागोजागी पडलेल्या खड्यांची कैफीयत लोकमतने अनेकवेळा मांडली होती. कान्हळगाव-मोहाडी हा डांबरीकरण झालेला रस्ता एकदा गुळगुळीत झाला, तेव्हापासून या रस्त्याच्या खड्यांची दुरुस्ती झाली नाही. पाच किलोमिटर अंतराचा हा रस्त्याची चाळणी झाली होती. या रस्त्याने अनेकांना तोडले अन् फोडलेही. पण, जिल्हा परिषदेच्या अधिपत्यात असणाºया रस्त्याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. तीन दशकापासून या रस्त्याने आमदार, खासदार, जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य अनेकांनी प्रवास केला. त्यांनीही या रस्त्याकडे दुर्लक्षच केले. पण, लोकमतने वेळोवेळी या रस्त्याच्या दुरावस्थेची व्यथा प्रकाशित केली. अखेर शासनाला या रस्त्याकडे लक्ष घालवे लागले.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मोहाडी-कान्हळगाव हा रसता मंजूर करण्यात आला आहे.
काही दिवसातच अनेकांना यातना देणारा त्रासदायक असणारा डांबरीकरणाचा रस्ता पुन्हा चकचकीत होणार आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता आपल्यामुळेच होऊ शकले याचा श्रेय घेणारे नेते मिळणार आहे. तथापि, या रस्त्याने अनेकांनी वेदना सहन केली त्या वेदनेची व्यथा ‘लोकमत’ने मांडली. त्यामुळे खरी श्रेय ‘लोकमत’ला जातेय अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

प्रसार माध्यमाने शेवटी दुर्लक्षीत कान्हळगाव रस्त्यानेकडे प्रशासन, शासनाला लक्ष घालायला बाध्य केले. लोकप्रतिनिधींनी शेवटी लोकांची हाक ऐकली. आता हा रस्ता पुन्हा छान होणार आहे.
-राजू उपकर, उपसरपंच ग्रामपंचायत कान्हळगाव / सिरसोली.

Web Title: The journey of their tragedy ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.