जेएसव्ही डेव्हलपर्सने लाखोंनी गंडविले

By admin | Published: June 15, 2016 12:57 AM2016-06-15T00:57:11+5:302016-06-15T00:57:11+5:30

शहरात जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया लि. या नावाची कंपनी उघडली होती. त्या कंपनीत सहा वर्षात दामदुप्पट करून देतो म्हणून

JSAV developers looted millions | जेएसव्ही डेव्हलपर्सने लाखोंनी गंडविले

जेएसव्ही डेव्हलपर्सने लाखोंनी गंडविले

Next

ग्राहकांचे उपोषण : कारवाई करून रक्कम परत करण्याची विनंती
भंडारा : शहरात जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया लि. या नावाची कंपनी उघडली होती. त्या कंपनीत सहा वर्षात दामदुप्पट करून देतो म्हणून खातेदारांना प्रलोभन दिले आणि एफ.डी. व आर.डी. च्या नावाने करोडो रुपयांनी फसवणूक करून गैरअर्जदार बेपत्ता झाले आहेत.
भंडारा शहरात सुरु असलेले आॅफिस सुद्धा बंद केले आहेत. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट लक्षात आले.
त्यामुळे काही अर्जदारांनी से.बी. या केंद्रीय संस्थेकडे मुंबई येथे न्याय मागितला. त्यात १८ फेब्रुवारी २०१६ रोजी से.बी. ने गुंतवणूकदारांच्या बाजूने स्पष्ट निकाल दिला.
या निकालामध्ये जे.एस.व्ही. डेव्हलपर्सच्या नावाने असलेली संपत्ती जप्त करून गुंतवणुकदारांचे रक्कम मिळवून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश देण्यात आले.
या निकालाच्या आधारे जिल्हाधिकारी भंडारा आणि पोलीस अधीक्षक भंडारा यांना तिनदा विनंती अर्ज करून सुद्धा अजूनपर्यंत कुठलीच कारवाई केलेली नाही व आम्हा गुंतवणूकदारांची रक्कम मिळालेली नाही.
जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया लि. या कंपनीचे सर्व शाखा व कार्यालय बंद करून वरील सर्व गैरअर्जदारांनी ‘जय विनायक बिल्डक्रॉप्ट’ या नावाने नवीन संस्था उघडून लोकांना पुन्हा फसविण्याचा गोरखधंदा सुरु केला असल्याची माहिती आहे. याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)

ग्राहकांच्या मागण्या
१८ फेब्रुवारी २०१६ रोजी से.बी. मुंबई यांच्या आदेशानुसार जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया लि. या संस्थेकडे असलेली मालमत्ता जप्त करून गुंतवणुकदारांची रक्कम परत करण्यात यावी, जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया लि. व जय विनायक बिल्डकॉप्ट या कंपनीच्या संचालकाने एफ.डी., आर.डी. नावाने दामदुप्पट करून देतो असे प्रलोभन देवून फसवणूक करणाऱ्या संचालक व संबंधित मध्यस्थी असणाऱ्या व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया लि. व जय विनायक बिल्डक्रॉप्ट या कंपनीचे संचालक संध्या आंबेडारे, अमित चौधरी, राजेंद्र भाले, दिनेश टेंभरे, पाथर्डे, विजयलक्ष्मी कठेत व इतर संचालकांनी जनतेकडून बेकायदेशीर जमविलेल्या मालमत्तेची सी.बी.आय. चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी ज्ञानेश्वर निसुरे, कन्हैया नागपुरे, श्यामपाल काळे, रमेश बोंद्रे, शिवशंकर पाटील, क्रिष्णा कुंभलकर, युवराज देव्हारे, तिलकचंद्र शहारे, मधुकर येरपुडे, विष्णुदास लोणारे, प्रशांत रामटेके, शैलेश बोंद्रे आदींनी केली आहे.

Web Title: JSAV developers looted millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.