कोरोनाच्या संकटातही तंटामुक्त समितीच्या माध्यमातून न्यायदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:53+5:302021-07-10T04:24:53+5:30

कवलेवाडा ग्रामपंचायत तंटामुक्त समिती ४० पदाधिकाऱ्यांची आहे. सरपंच केशव बडोले, उपसरपंच स्वप्निल खंडाईत यासह आजी-माजी पदाधिकारी व गावातील ...

Judgment in the Corona crisis also through a dispute-free committee | कोरोनाच्या संकटातही तंटामुक्त समितीच्या माध्यमातून न्यायदान

कोरोनाच्या संकटातही तंटामुक्त समितीच्या माध्यमातून न्यायदान

Next

कवलेवाडा ग्रामपंचायत तंटामुक्त समिती ४० पदाधिकाऱ्यांची आहे. सरपंच केशव बडोले, उपसरपंच स्वप्निल खंडाईत यासह आजी-माजी पदाधिकारी व गावातील प्रभावशाली व्यक्तींचा समावेश आहे. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक के.ना. कापसे गुरुजी गत सात वर्षापासून कार्यभार सांभाळत आहेत. त्यांच्या जोडीला निमंत्रक पोलीस पाटील अर्थात सचिव गुणीराम बोरकर आहेत. दीर्घ अनुभवी समाजातील ज्येष्ठ व्यक्तीत पोलीस पाटील माया खंडाईत कवलेवाडा, खैरीचे पोलीस पाटील रमेश शेबे, मेंगापूरचे पोलीस पाटील रोजिना शहारे, जयश्री बेलखोडे, वैशाली खंडाईत, अश्विनी लेंडे, रघुनाथ रोटकर, राजू खंडाईत, हरिदास बडोले आदी मान्यवर उपस्थित राहतात. केवळ सभागृहात बसून तंटे न सोडवता प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन प्रतिवादी, वादी यांच्या सामोपचारातून वादांना समजविले जाते. सोमवारी पार पडलेल्या समितीत सहापैकी सहाही तंटे सोडविल्या गेले. लोकांचे यातून होत असलेले समाधान व योग्य ते समुपदेशन खूप महत्त्वाचे ठरत आहे. इतरही गावातील ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीने कवलेवाडा ग्रामपंचायत कमिटीचा आदर्श घेत गाव तंटामुक्त करण्याच्या दृष्टीने पावले उचलणे काळाची गरज आहे.

Web Title: Judgment in the Corona crisis also through a dispute-free committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.