नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:23 AM2021-06-27T04:23:08+5:302021-06-27T04:23:08+5:30
यंदा मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्याने दुसऱ्यांदा लॉकडाऊन करावा लागला. यामुळे यंदाही ऐन हंगामातच व्याघ्र प्रकल्प बंद ...
यंदा मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्याने दुसऱ्यांदा लॉकडाऊन करावा लागला. यामुळे यंदाही ऐन हंगामातच व्याघ्र प्रकल्प बंद करण्यात आले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, परिस्थिती नियंत्रणात येत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या राज्यात गोंदिया जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट सर्वांत कमी आहे. परिणामी शासनाने व्याघ्र प्रकल्पांना खुले करण्यास परवानगी दिली आहे. शनिवारपासून (दि.२६) नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुले होणार असून, पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे. मात्र, ही मजा फक्त येत्या ३० जूनपर्यंतच घेता येणार आहे. त्यातही कोरोना नियमांचे सक्तीने पालन करावयाचे आहे. आता मान्सून सुरू झाला असून, जंगलात प्रवेशबंदी असते. त्यात आता पाच दिवसांची सूट मिळाली असल्याने दिलासा मिळाला आहे.