‘जंक फूड’ वाढवत आहे विविध आजार

By admin | Published: January 5, 2016 12:38 AM2016-01-05T00:38:09+5:302016-01-05T00:38:09+5:30

बैठे काम करणाऱ्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. साधारण २५ ते ३० टक्के श्रमजीवी रस्ते, कॅफे व इतर बाह्य ठिकाणांवरील जंक फूडवर अवलंबून राहतात.

'Junk Food' is expanding to various ailments | ‘जंक फूड’ वाढवत आहे विविध आजार

‘जंक फूड’ वाढवत आहे विविध आजार

Next

भंडारा : बैठे काम करणाऱ्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. साधारण २५ ते ३० टक्के श्रमजीवी रस्ते, कॅफे व इतर बाह्य ठिकाणांवरील जंक फूडवर अवलंबून राहतात. परिणामी, हे लोक लठ्ठपणा या आजारापासून पीडित आहेत. त्यांच्यामध्ये विविध आजारांचा धोका वाढला आहे. आयर्नच्या कमी सेवनासह अपुऱ्या आहारामुळे अ‍ॅनेमिया व जीवनसत्त्वाची कमतरता असण्याची प्रकरणे वाढली आहेत. एका सर्वेक्षणात २४ टक्के पुरुष व १९ टक्के स्त्रियांमध्ये जीवनसत्त्व (ब) ची कमतरता आढळून आली आहे.
हृदयविकारात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक
आईच्या गर्भामध्ये असल्यापासून हृदयाचे काम सुरू होते, ते अखेरचा श्वास घेईपर्यंत सुरूच असते. जन्मापासून अखेरपर्यंत अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या शरीराचा हा एकमेव महत्त्वपूर्ण असा अवयव आहे, त्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. असे असताना शहरातील २५.२१ टक्के पुरूष हृदयविकाराने पीडित आहेत. धक्कादायक म्हणजे, यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. २६.२६ टक्के महिला या आजाराने पीडित आहेत.
२३ टक्के स्त्री-पुरुषांना डोळ्यांचा विकार
लोहयुक्त आहाराच्या अभावामुळे २३.६९ टक्के पुरुष व २३.८८ टक्के स्त्रियांमध्ये डोळ्यांविषयक समस्या असल्याचे आढळून आले. वेळेचा अभाव, १० तासांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत लॅपटॉप्स व संगणकांचा वापर. रात्री दोन-तीन तास मोबाईलचा वापर यामुळे मुख्यत: २० ते २५ वर्षे वयोगटातील युवा पिढीच्या दृष्टीवर परिणाम झाल्याचे आढळून आले. लोहयुक्त आहाराच्या कमी सेवनामुळे १९.३६ टक्के स्त्रिया अ‍ॅनेमियापासून पीडित आहेत.
२८ ते ३५ वर्षीय स्त्रियांमध्ये वाढतोय लठ्ठपणा
शहरात लठ्ठपणाच्या केसेसमध्ये दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ होत आहे. तणाव, जंक व तेलकट फूडचे अधिक प्रमाणात सेवन यासोबतच आठवड्यामधून दोन किंवा तीनदा जेवणासाठी बाहेर जाणे, या कारणांमुळे मुख्यत: २८ ते ३५ वर्षे वयोगटातील स्त्रियांना लठ्ठपणाचा धोका असल्याचे आढळून आले आहे. जीवनसत्त्वाचे कमी सेवन व चरबीयुक्त पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन अशा खाण्याच्या सवयींमुळे २५ ते ३० टक्के युवा पिढींच्या जीवनात आजाराचा धोका वाढला आहे.
३१.९ टक्के पुरुष मधुमेही
भारतामध्ये जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रूग्ण आढळतात आणि मृत्यूच्या कारणामध्ये मधुमेह हे सर्वाधिक कारणांपैकी एक आहे. मधुमेह ही व्याधी केवळ रक्तातील वाढलेली शर्करा या स्वरूपात नसून तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हळूहळू निकामी करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मधुमेह होण्याच्या कारणांमध्ये चुकीचा आहार व व्यायामाचा अभाव ही दोन महत्त्वाची करणे आहेत. शहरात ३१.०९ टक्के पुरूष तर २६.२३ टक्के महिला या व्याधीने पीडित असल्याचे स्पष्ट झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 'Junk Food' is expanding to various ailments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.